जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Video - नवरीबाईसमोरच नवरदेव असं काही बोलून गेला की, मेहुणी म्हणाली, 'लाज नाही वाटत का?'

Wedding Video - नवरीबाईसमोरच नवरदेव असं काही बोलून गेला की, मेहुणी म्हणाली, 'लाज नाही वाटत का?'

लग्नात भावोजी-मेहुणीत जुंपली.

लग्नात भावोजी-मेहुणीत जुंपली.

नवरदेव आणि नवरीची बहीण म्हणजे भावोजी-मेहुणीत जुंपलेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 02 फेब्रुवारी : लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवरदेव आणि नवरीबाईच्या बहिणीची लग्नातच जुंपली. नवरदेव नवरीबाईसमोरच मेहुणीला असं काही बोलून केला की, मेहुणीने त्याला सर्वांसमोरच चांगलं सुनावलं. लाज नाही वाटत का? असंही तिने त्याला विचारलं. नवरदेव आणि मेहुणीत असं नेमकं झालं तरी काय? नवरदेव नेमकं असं काय बोलला पाहुयात. लग्न म्हटलं की नवरा-नवरी यांच्याशिवाय आणखी काही क्षण असतात नवरदेव आणि नवरीबाईच्या बहिणीचे म्हणजे मेहुणी-भावोजीचे. मेहुणी-भावोजी यांना समोरासमोर आणणारी लग्नातील खास प्रथा म्हणजे चप्पल चोरी. नवरदेवाचे चप्पल चोरून नवरीची बहीण त्याच्याकडे चपलांच्या बदल्यात पैसे मागते. या लग्नातील व्हिडीओतही हाच तो क्षण आहे. भावोजी-मेहुणीत चपलेवरून जुंपलेली असताना नवरदेव असं काही बोलून जातो की मेहुणी त्याला लाज वाटत नाही का, असं विचारते. हे वाचा -  आता हद्दच झाली राव! भरमंडपातच त्याने नवरीला…, नवरदेवाच्या मित्राच्या विचित्र कृत्याचा VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा आणि नवरी एकत्र उभे आहेत. त्यांच्याभोवती नातेवाईकही आहेत. नवरा-नवरीसमोर नवरीच्या बहिणी उभ्या आहेत. ज्यांच्या हातात नवरदेवाची चप्पल आहे. वराकडे ते चप्पलांच्या बदल्यात पैसे मागत आहेत. नवरदेव 5 हजार देण्याची तयारी दर्शवतो. तेव्हा त्याच्या मेव्हण्या हैराण होतात. नवरीची एक बहीण नवरदेवाला, असं बोलताना लाज नाही वाटत का?, असं विचारते. नवरदेवही तिला बिलकुल नाही, असं उत्तर देतो.

News18लोकमत
News18लोकमत

शेवटी नवरी आपला नवरा आणि बहिणींमध्ये मध्यस्थी करते. ती नवऱ्याला आपल्या बहिणींना 21,000 रुपये द्यायला सांगते. नवरदेव तयार होते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला पुन्हा रोखतात आणि पैसे दिल्याशिवाय कुठे जात आहात, असं विचारतात. नवरदेव आपण जेवायला जातो आहे असं सांगतो. पण पैसे दिल्याशिवाय आपण सोडणार नाही, यावर मेव्हण्याही ठाम राहतात. हे वाचा -  लग्नात फोटोग्राफरने टांग दिल्याने सटकली! लेकीची पाठवणी करताच वडीलांनी उचललं मोठं पाऊल अखेर या मजामस्तीनंतर नवरदेव मेव्हणांच्या हाता पैशांचं पाकीट ठेवतो. नंतर एकमेकांना मिठी मारतात. नवरदेवाच्या पायात मेव्हण्या आपल्या हातांनी चप्पल घालताना दिसतात.

जाहिरात

WeddingBazaar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुम्हाला लग्नाचा असा काही किस्सा माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात