मुंबई : कोणाचं लग्न असतं तेव्हा आपल्या बाजूने सगळं काही परिपूर्ण आणि अद्वितीय करण्याचा प्रयत्न केला जातो. वधू-वराच्या पेहरावापासून सर्व गोष्टी वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी अनेक महिने मेहनत घेतली जाते. त्यात थोडीशीही चूक झाली तरी केलेल्या सर्व कामावर पाणी पडतं. असाच काहीसा प्रकार एका लग्नासाठी छापलेल्या निमंत्रणपत्रिकेबाबत घडला. एखाद्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळते तेव्हा विवाहाचा दिवस आणि ठिकाण नेमकेपणाने समजावं यासाठी ती काळजीपूर्वक वाचली जाते. निमंत्रणपत्रिकेत विवाहाचं ठिकाण आणि वेळ याव्यतिरिक्त पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी घरातल्या लहान मुलांकडून विशेष निमंत्रणवर शब्द, काव्य किंवा शेरोशायरी लिहिण्याचा ट्रेंड आहे.
या शेरोशायरीची निवड करण्यासाठी घरातली मंडळी खूप रिसर्च करतात. एका निमंत्रणपत्रिकेवरची शायरी नीट वाचल्यानंतर नातेवाईकांना जबर धक्का बसला. ‘‘माझे काका किंवा आत्याच्या लग्नाला जरूर या` किंवा `हळद आहे, चंदन आहे हे तर नात्यांचे बंधन आहे.’’ अशी बरीच वाक्यं लग्नपत्रिकेत तुम्ही वाचली असतील. या सर्वांत या कार्डावरच्या एक वाक्याने सर्वांचंच लक्ष वेधतं. खरं तर ही एक वेगळी आणि मोठी चूक आहे. त्यामुळे या निमंत्रणपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात एक शायरी लिहिली होती. त्यात असं लिहायचं होतं, की ‘भेज रहा हूँ निमंत्रण, प्रियवर तुम्हें बुलाने को, हे मानस के राजहंस तुम भूल ना जाना आने को;’ पण यात एक चूक झाली ‘भूल ना जाना’च्या ऐवजी ‘तुम भूल जाना’ असं छापलं गेलं. लग्नाआधी पत्रिका का जुळवल्या जातात? यामागचं नेमकं कारण माहितीय? ‘हा तर आमचा अपमान आहे’ ही लग्नाची निमंत्रणपत्रिका फेसबुकवरच्या Jokes hi jokes नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पत्रिका पाहिल्यावर अनेक जण चेष्टा करत आहेत. 13 एप्रिल रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 4.7K जणांनी लाइक केला आहे. यावर युझर्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एक युझर लिहितो, `हा तर मोठा अपमान आहे, मित्रांनो.` दुसऱ्या एका युझरने अशी कमेंट केली आहे, की `कार्ड छापणाऱ्याने लग्नाला बोलावणाऱ्या व्यक्तीच्या मनातलं वाक्य छापलं आहे.` सध्या ही निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असूनॉ, चर्चेचा विषय ठरली आहे.

)







