मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फ्लाइंग डोसा झाला आता ही 'हेलिकॉप्टर भेळ' बघितली का? सोशल मीडियावर तुफान व्हायरल

फ्लाइंग डोसा झाला आता ही 'हेलिकॉप्टर भेळ' बघितली का? सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भेळपुरी हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता/स्नॅक पदार्थ आहे. व्हिडिओमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता स्वादिष्ट भेळपुरी तयार करताना दिसत आहे. त्याची भेळ बनवण्याची गती पाहून अनेकजण चकित झाले.

  मुंबई, 09 ऑगस्ट: सोशल मीडियावरून आजकाल कोणतीही गोष्ट क्षणार्धात शेअर होते. हटके आणि वेगळ्या गोष्टी तर खूप शेअर होतात, लोक आपल्या सोशल मीडियावर त्या गोष्टी स्टेटसही ठेवतात. सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात असल्याने एकाद्या ठिकाणचा व्हिडिओ सोशल मीडियावरून कुठल्या-कुठे शेअर होतो आणि पाहिला जातो, याबाबत कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईतील 'फ्लाइंग डोसा'चा व्हिडिओ बराच शेअर झाला होता, त्याचप्रमाणे सध्या हेलिकॉप्टर भेळ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. मुंबईच्‍या एका भोजनालयाचा 'फ्लाइंग डोसा' अनेकांना आठवत असेल जो गेल्या वर्षी जोरात व्हायरल झाला होता. डोसा बनवण्याच्या कल्पक पद्धतीमुळे फ्लाइंग डोसाची चर्चा झाली. उडता वडा पाव, उडता दही वडा आणि बरंच काही त्यावेळी चर्चेत होतं. आता असाच एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हेलिकॉप्टर भेळची इंटरनेटवर सध्या चलती आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपणही पाहु शकता. विद्युत वेगात एक कशी भेळ तयार करत आहे. .
  क्लिपमध्ये, एक स्ट्रीट फूड विक्रेता स्वादिष्ट भेळपुरी तयार करताना दिसत आहे. त्याची भेळ बनवण्याची गती पाहून अनेकजण चकित झाले. भेळपुरी हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता/स्नॅक पदार्थ आहे. ज्यामध्ये शेंगदाणे, बटाटे, कांदा, टोमॅटो आणि मसालेदार चटण्या एकत्र करून हलका पण स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो. सहसा, सर्व घटक एका भांड्यात घेतले जातात आणि सर्व्ह करण्यापूर्वी एकत्र मिसळले जातात. मात्र, हा भेळपुरीवाला फार वेगात भेळमधील घटक मिक्सिंग करत होता. त्याच्या या गतीमुळे लोक हेलिकॉप्टर भेळ म्हणू लागलेत. आणखी काही मिनिटे अशीच गती राहिली असती तर भेळमधून वीज निर्माण झाली असती, असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे हेलिकॉप्टर भेळ व्हिडिओ @Trollgramofficial युजरने Instagram वर शेअर केला होता. तेथे त्याला आधीच 94.2k व्ह्यूज आणि 3.3k लाईक्स मिळाले आहेत. याला ऑनलाइन खाद्यप्रेमींकडूनही अनेक प्रतिक्रिया मिळाल्या, भेळपुरी-विक्रेत्याच्या कौशल्याने लोक प्रभावित झाले आणि त्याचे कौतुक होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Social media viral, Viral

  पुढील बातम्या