Home /News /maharashtra /

दारू विक्री सुरू झाली पण बारामतीतून आली धक्कादायक बातमी, सरपंचाच्या पती मृत्यू

दारू विक्री सुरू झाली पण बारामतीतून आली धक्कादायक बातमी, सरपंचाच्या पती मृत्यू

दत्तात्रय वाघमारे हे शिरष्णे गावच्या महिला सरपंचांचे पती होते. त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते.

बारामती, 05 मे : राज्यात लॉकडाउन 3 टप्प्याला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये अटी शिथील केल्या आहे. त्यात दारू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. परंतु, दारूची दुकानं उघडली असली तरीही बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील शिरष्णे गावात एका टोळक्याने दारू समजून विषारी द्रव प्याल्याने दत्तात्रय वाघमारे या तरूणाचा मृत्यू झाला. तर सात जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना प्रादुर्भाव  वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला होता.  लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्पात जीवनावश्यक वस्तू वगळता दारू विक्रीसाठी बंदी होती. त्यामुळे तळीरामांची गैरसोय झाली होती. या काळात अनेक तळीरामांनी दारू मिळवण्यासाठी धडपड केली. हेही वाचा -  लॉकडाऊनमुळे राज्यासमोर आर्थिक संकट, ठाकरे सरकार बंद करणार 'ही' कामं याच काळात दारू समजून येथील सुमारे सात ते आठ जणांनी हे औषध प्राशन केले होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडे यासंबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे,  दत्तात्रय वाघमारे हे शिरष्णे गावच्या महिला सरपंचांचे पती होते. त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते. लॉकडाउनच्या काळात दारू समजून ते प्राशन केल्याचे समजते. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये राज्यांनुसार धावणार 300 स्पेशल ट्रेन? असा आहे रेल्वेचा प्लॅन स्पिरिट प्यायल्यामुळे या सातही जणांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून या सर्वांवर उपचार सुरू होते. परंतु, आज दत्तात्रय वाघमारे यांचा  उपचारादरम्यान बारामतीत मृत्यू झाला. अन्य लोकांवर बारामती आणि फलटणमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या