Home /News /maharashtra /

पुण्यात दारू घेण्यासाठी गाडीवर नाही पायी जावं लागणार, हे 6 नियम पाळावेच लागणार

पुण्यात दारू घेण्यासाठी गाडीवर नाही पायी जावं लागणार, हे 6 नियम पाळावेच लागणार

दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर दुकानदार आणि ग्राहकांना काही नियम केले गेले आहेत.

    पुणे, 5 एप्रिल : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत यासाठी सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. सरकारच्या आदेशानंतरही दारू विक्रीला परवानगी द्यायची की नाही, याबाबत पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर सोमवारी दुपारी ही परवानगी देण्यात आली. मात्र दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर दुकानदार आणि ग्राहकांना काही नियम केले गेले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देत दारू विक्री आणि खरेदीबाबतच्या नियमांची माहिती दिली आहे. त्यामुळे उत्साहाच्या भरात दारू खरेदीसाठी गेलेल्या मद्यप्रेमींना हे नियम पाळावेच लागणार आहेत. नाहीतर दारू खरेदीचा प्रवास त्यांना थेट तुरुंगापर्यंत घेऊन जाऊ शकतो. 1) सामाजिक अंतर मानके पाळले जातील याची खबरदारी मद्यविक्रीच्या दुकानांनी घेतली पाहिजे व रेड झोन मध्ये हे त्यांचे कर्तव्यच आहे. 2) कोणत्याही दुकानामुळे गर्दी होऊ लागली तर त्याबद्दल कारवाई केली जाईल. 3) वेळा घालून टोकन देण्याची पद्धत अवलंबावी. 4. सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांना दुकानाबाहेर थांबवावे. सॅनिटायझर्सची व्यवस्था करावी. 5)पूर्वीप्रमाणेच वैध परवाना असल्याखेरीज वाहनाला परवानगी नाही. यात मध्य खरेदीच्या कारणांचाही समावेश आहे. 6 )घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी. अन्यथा जप्ती व किमान 2500₹ च्या हमीपत्राची कारवाई दरम्यान, पुण्यात काल दिवसभरात 61 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि 6 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सोमवारपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात बदलले आहेत. त्यानुसार पुण्यात आता निरीक्षणात आलेल्या 69 Micro containment Zones मध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या