मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल; महिला वेटरने जे केलं ते पाहून अंगावर येईल काटा

VIDEO - हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल; महिला वेटरने जे केलं ते पाहून अंगावर येईल काटा

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

  • Published by:  Priya Lad

कॅनबेरा, 08 मे : साधी छोटी पाल जरी पाहिली तरी अनेकांना घाम फुटतो. तिला हाकवतानाच नाकी नऊ येतात. पण सध्या सोशल मीडियावर एका भल्या मोठ्या पालीचा  (giant monitor lizard) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जी चक्क रेस्टॉरंटमध्ये घुसली आहे. ही पाल हॉटेलमध्ये घुसताच महिला वेटरने डेअरिंग करत असं काही केलं ज्याची चर्चा होते आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पालीचा व्हिडीओ रेक्स चॅपमनने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक वेटर महिला काहीतरी खेचताना दिसते आहे आणि हे दुसरं तिसरं काही नाही तर भलीमोठी पाल आहे.

हॉटेलमध्ये अनेक ग्राहकही दिसत आहेत. त्यांच्यासमोरच ही महिला या पालीची शेपटी खेचले आणि तिला खेचत खेचत नेते. त्यावेळी पालसुद्धा स्वतःला वाचवण्याचा आणि वेटरच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करते. ती आपलं तोंड वर करून, मागे करून वेटरला घाबरवण्याचा, तिच्या अंगावर जाण्याचाही प्रयत्न करते. पण महिला वेटर बिलकुल घाबरत नाही. ती त्या पालीला खेचून रेस्टॉरंटबाहेर काढतेच.

हे वाचा - Shark Vs shark : समुद्रात रंगलं युद्ध; लढाईचा थरारक VIDEO VIRAL

तसा हा व्हिडीओ खूप जुना आहे. रिपोर्टनुसार ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. 2017 साली घडलेली ही घटना. पण त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चांगलाच व्हायरल होता आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. नेटिझन्सनी महिलेच्या हिमतीला दाद दिली आहे. तिचं कौतुक केलं आहे.

दरम्यान याआधी एका दुकानात अशी पाल घुसली होती. थाई ट्रॅव्हल एजेन्सी मुंडो नोमादा (Thai travel agency Mundo Nomada) यांनी ट्वीटरवर शेअर केला होता. थायलँडमधील 7 इलेव्हन आउटलेट (7 Eleven outlet in Thailand) मधील ही घटना.

हे वाचा - अरे बापरे! शार्कने बोटच जबड्यात धरली आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

ही पाल स्टोअरमधील कपाटावरून सरपटताना दिसत आहे. यादरम्यान या भल्या मोठ्या पालीने दुकानातील अनेक सामान खाली पाडलेलं दिसतं.  घाबरलेले ग्राहक लांब उभे राहून ओरडत असल्याचे दिसून येत आहे. ही भलीमोठी पाल कपाटावर चढली होती आणि वर जाऊन बसली होती. यावेळी स्टोअरमधील लोक व्हिडिओ करत होते.

First published:

Tags: Lizard, Viral, Viral videos, Wild animal