मराठी बातम्या /बातम्या /Viral /दारूची इन्फिनिटी बाटली अनेकांना वाटते हवीहवीशी; पण ही बनवतात कशी माहिती आहे का?

दारूची इन्फिनिटी बाटली अनेकांना वाटते हवीहवीशी; पण ही बनवतात कशी माहिती आहे का?

काय असते इन्फिनिटी बॉटल?

काय असते इन्फिनिटी बॉटल?

इन्फिनिटी बाटल्यांचं नेमकं वैशिष्ट्य काय असतं, या बाटल्यांमधलं मद्य पिण्यास अनेक जण का उत्सुक असतात?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    मुंबई, 02 फेब्रुवारी : मद्यपान आरोग्यासाठी धोकादायक असतं. मद्यपानामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दारूचं व्यसन टाळणं गरजेचं आहे. एकीकडे ही स्थिती असताना अलीकडे मद्यपान हे एक स्टेटस समजलं जातं. त्यामुळे मद्यशौकीनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन प्रकारचं मद्य एकत्र केल्यास ते पिणं धोकादायक ठरू शकतं, अशा प्रकारचा समज मद्यप्रेमींमध्ये दिसून येतो; पण हे पूर्ण सत्य नाही. वाइन एक्सपर्ट यावर सातत्याने प्रयोग करत आहेत. विविध प्रकारच्या हार्ड लिकर मिक्स करण्याच्या प्रक्रियेला मिक्सॉलॉजी म्हणतात. मिक्सॉलॉजीमुळे इन्फिनिटी बाटलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या बाटल्यांचं नेमकं वैशिष्ट्य काय असतं, या बाटल्यांमधलं मद्य पिण्यास अनेक जण का उत्सुक असतात, ते जाणून घेऊ या.

    दोन प्रकारचं मद्य मिसळून पिणं धोकादायक ठरू शकतं, हा मद्यपान करणाऱ्यांमध्ये पसरलेला सर्वांत मोठा गैरसमज होय. हे खरं असतं तर जगभरात कॉकटेलचं अस्तित्वच नसतं. वाइन एक्स्पर्ट्स अनेक दशकांपासून मद्याचे विविध प्रकार मिसळण्याचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे आज जगात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत, की कदाचित ते सर्व चाखायला आयुष्य कमी पडेल. वेगवेगळ्या प्रकारच्या हार्ड लिकर मिसळण्याच्या पद्धतीला मिक्सॉलॉजी असंही म्हणतात. गेल्या काही दशकांमध्ये, मिक्सॉलॉजीच्या वाढत्या ट्रेंडसह इन्फिनिटी बाटल्यांची लोकप्रियतादेखील वाढली आहे. वाइन जगतातल्या उच्चभ्रू व्यक्ती या बाटल्यांचं कलेक्शन करणं अभिमानास्पद मानतात. इन्फिनिटी बाटली ही एक अनोखी चव असलेली दारू तयार करण्याचा एक मार्ग आहे. त्यामागची संकल्पना अगदी सोपी आहे. एक रिकामी बाटली घ्या आणि त्यात विविध प्रकारचं वापरण्यायोग्य अल्कोहोल भरून ठेवा आणि नवीन फ्लेवर तयार करा. हे कोणत्याही प्रकारच्या स्पिरिटपासून तयार केलं जाऊ शकतं. परंतु, व्हिस्कीच्या इन्फिनिटी बाटल्या तयार करण्याचा सर्वांत जास्त ट्रेंड आहे. या बाटल्यांमधलं मद्य वापरणं आणि नंतर पुन्हा त्यात दुसरं मद्य भरून ठेवणं या सततच्या प्रक्रियेमुळे इन्फिनिटी बाटल्या अद्वितीय ठरतात. विविध प्रकारच्या मद्यांचं मिश्रण हा या इन्फिनिटी बाटल्यांचा यूएसपी आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकारच्या बाटल्या तयार करण्याचा ट्रेंड मद्यप्रेमींमध्ये वाढला आहे.

    मद्य मिश्रणाची परिपूर्ण माहिती असेल, तर इन्फिनिटी बाटली हे व्हिस्कीचे अनोखे फ्लेवर्स मिळवण्याचं साधन बनू शकतं. तथापि, या अनोख्या चवीची प्राप्ती खूप क्षणभंगुर आणि भाग्याची गोष्ट असू शकते. कारण इन्फिनिटी बाटल्यांमध्ये मद्य मिसळण्याची आणि वापरण्याची प्रक्रिया सतत सुरू राहते. एखाद्यावेळी तुम्हाला यातून खास फ्लेवर मिळेल तर काही काळानंतर विचित्र फ्लेवरसुद्धा. तुम्ही व्हिस्कीचे निस्सीम चाहते असाल आणि अतिरिक्त पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही इन्फिनिटी बाटल्या बनवण्याचा मजेदार प्रयोग नक्कीच करू शकता.

    जगभरातले बहुतांश मद्यप्रेमी घरीच एखादी रिकामी बाटली घेऊन त्यात थोडीशी व्हिस्की टाकून इन्फिनिटी बाटली तयार करतात. वेगवेगळ्या प्रकारची व्हिस्की एकत्र मिसळल्याने एक विचित्र फ्लेवर तयार होतो. हा फ्लेवर तुम्हाला सुखद धक्का किंवा झटका देऊ शकतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर काही वर्षं एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची व्हिस्की पीत असेल तर त्याने त्यातली थोडी व्हिस्की मोठ्या बाटलीत ओतून ठेवली पाहिजे. तसं पाहिलं तर त्या व्यक्तीने आयुष्यात प्यायलेल्या व्हिस्कीची ही डायरी असते. प्रत्येक वेळी कुणी तरी त्यात नवीन फ्लेवर टाकला की इन्फिनिटी बाटली भरलेली व्हिस्की आणखीच अनोखी बनते.

    गेल्या दशकभरापासून इन्फिनिटी बाटल्यांचा ट्रेंड वाढला असल्याचं मानलं जातं. आता हळूहळू हार्डकोर व्हिस्की पिणाऱ्यांमध्ये हा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. तथापि, ही प्रक्रिया शतकांपासून चालत आल्याचे पुरावे आहेत. जेव्हा आपल्या पूर्वजांनी सिरॅमिकच्या भांड्यातून अल्कोहोल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना हे समजलं की जुन्या वाइनमध्ये नवीन वाइन मिसळून चांगली चव मिळवता येते.

    खरं तर इन्फिनिटी हा शब्द खूप काही सांगून जातो. इन्फिनिटी म्हणजे अनंत. तुम्ही केवळ एक रिकामी बाटली घ्यावी आणि त्यात तुमच्या आवडीनुसार आणि ऐपतीनुसार सर्वांत खास व्हिस्कीचे प्रकार एकत्र मिसळत जावं. या बाटलीतलं मद्य तुम्ही वापरत असाल तर त्या दर वेळी नवनवीन प्रकारचं मद्य मिसळत चला. सातत्याने नवीन प्रकारचं मद्य मिसळत राहिल्याने बाटलीतल्या मद्याची चव बदलत राहील. प्रत्येक वेळी नवी चव ही इन्फिनिटी बाटलीची मूळ संकल्पना आहे. बाटलीतलं सर्व मद्य घेतलं तर ही संकल्पना साध्य होणार नाही. त्यामुळे इन्फिनिटी बाटली तिच्या नावाप्रमाणे अनंत काळापर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Alcohol, Lifestyle