...आणि भिंतीवर चिकटलेल्या बेडकाच्या पोटात अचानक पेटली लाइट, VIDEO पाहून व्हाल हैराण

...आणि भिंतीवर चिकटलेल्या बेडकाच्या पोटात अचानक पेटली लाइट, VIDEO पाहून व्हाल हैराण

हे कसं शक्य आहे? हा अद्भूत VIDEO पाहिला नसेल तर अजिबात मिस करू नका.

  • Share this:

नवी दिल्ली 13 : सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहून तुम्हालाच अनेक प्रश्न पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बेडूक भिंतीवर चिकटलेला दिसत आहे. मात्र यामुळे लोकांचे लक्ष याकडे गेले नाही तर, तर बेडकाच्या पोटात अचानक लाइट पेटल्याचे पाहून लोकं हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकं हैराण झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती हाच विचार करत आहे की, हे कसं शक्य आहे? खरतर हा व्हिडीओ रात्री शूट करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, या बेडकानं रातकिडा खाल्ला, यामुळे रात्री बेडूक भिंतीवर चिकटल्यानंतर त्याच्या पोटात लाइट चमकू लागली.

वाचा-सावधान! मुंबईच्या रस्त्यांवर धावतोय मृत्यू... CCTV मध्ये कैद झाली भयंकर घटना

वाचा-VIDEO रस्त्यावरची कार बघता बघता गेली वाहून; अवघ्या तासाभराच्या पावसाचा कहर

ट्विटरवर हा व्हिडीओ 13 सप्टेंबर रोजी अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ आतापर्यंत 8.75 लाख लोकांनी पाहिला आहे. मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअरही केला जात आहे. कारण असा अद्भूत व्हिडीओ लोकांनी कधीच पाहिला नाही आहे. हा व्हि़डीओ कुठला आहे हे अद्याप कळले नसले तरी, हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण मात्र नक्की व्हाल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 13, 2020, 11:12 AM IST

ताज्या बातम्या