मुंबई 30 डिसेंबर : माणसाला अनेकदा असं वाटतं की तो सर्वांत हुशार प्राणी आहे आणि या संपूर्ण जगात त्याच्यापेक्षा हुशार आणि बुद्धिमान दुसरा कोणताच प्राणी नाही. पण ही त्याची सर्वांत मोठी चूक आहे. खरं तर, माणसांप्रमाणेच इतर प्राणीही खूप बुद्धीवान असतात आणि त्यांच्या पातळीवर स्वतःच्या हुशारीचं प्रदर्शन करत असतात. सध्या एका हरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या बुद्धिमत्तेचा एक अनोखा नमुना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये हरिण हुशारीने मोठं लोखंडी गेट ओलांडून रस्त्याने पुढे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. @fasc1nate नावाच्या या ट्विटर अकाउंटवर अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. नुकताच या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक हरिण बंद गेट ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे हरिण ते बंद गेटसुद्धा इतक्या हुशारीने ओलांडतं की पाहणारेही आश्चर्यचकित होतात. ना Hight पाहिली ना weight गेंड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक जंगल दिसत आहे. तिथे काटेरी तारा लावलेल्या आहेत आणि मध्यभागी एक मोठं लोखंडी गेट दिसत आहे. गेट आणि जमीन यामध्ये खूप अंतर आहे, ज्यातून लहान प्राणी सहज निघून बाहेर जाऊ शकतात, परंतु हरणाची शिंगं मोठी आहेत, त्यामुळे त्याला त्या गेटखालून निघणं शक्य नाही.
मात्र या व्हिडीओतील हरिण हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवताना दिसत आहे. गेटपाशी पोहोचल्यानंतर हरिण सर्वांत आधी आपलं एक शिंग गेटच्या खाली घालतं, आपलं शरीर त्यानुसार वळवतं आणि नंतर दुसरं शिंग गेटखाली घालून डोकं गेटबाहेर काढतं. दोन्ही शिंगं गेटखालून दुसऱ्या बाजूला काढल्यानंतर ते त्याचं शरीरही त्याखालून बाहेर काढतं. त्यानंतर ते हळूच तिथून बाहेर पडून चालू लागतं. या व्हिडीओला आतापर्यंत 57 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. दरम्यान, “हा व्हिडीओ पाहून आमचा विश्वास बसत नाही,” तो व्हिडीओ खोटा असल्याचे काहींनी म्हटलंय. तसंच माणसाने बनवलेला अडथळाही प्राणी इतक्या हुशारीने ओलांडत आहे, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकरी त्या हरणाच्या हुशारीचं कौतुक करत आहेत.