मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO

अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO

चंद्रपूरमधील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत 70 वर्ष जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. (Building Collapsed)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chandrapur, India
  • Published by:  Kiran Pharate

अमित राय, चंद्रपूर 01 ऑक्टोबर : चंद्रपूरमधील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत 70 वर्ष जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 2 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नंदुरबारमध्ये बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 17 गंभीर जखमी

ही इमारत अवघ्या काही सेकंदांमध्ये जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं. घटनेचा व्हिडिओही आता समोर आला असून हे दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं आहे. पुंडलिक पाटील नामक व्यक्तीची ही इमारत असून ती 70-80 वर्ष जुनी होती. जीर्ण झालेली ही इमारत कोसळल्याने या घटनेला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

पुंडलिक पाटील आणि त्यांचं कुटुंब या इमारतीत वास्तव्याला होतं. इमारत अचानक हलू लागल्याने कुटुंबातील व्यक्ती बाहेर आल्या. मात्र, घटनेत दोन महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे पथक आणि पोलिसांनी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. जुनी आणि मोडकळीस आलेली ही इमारत असल्याने मनपाने आधीच ती रिकामी करण्याचा इशारा दिला होता, असंही सांगितलं जात आहे.

Shocking! नागपुरात चिमुकल्यांच्या प्ले एरियात घुसून अजगराने केली शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात पाहायला मिळतं की आजूबाजूला लोकांची भरपूर गर्दी जमा झाली आहे. यातीलच कोणीतरी घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. ही तीन मजली इमारत अवघ्या 11 सेकंदात पूर्णपणे कोसळते. यानंतर सगळीकडे धूळ पसरल्याचं पाहायला मिळतं

First published:

Tags: Shocking video viral