जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तरुणीने लावली अशी युक्ती, पाहून थक्क व्हाल

Viral Video : बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तरुणीने लावली अशी युक्ती, पाहून थक्क व्हाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

कदाचित हा व्हिडीओ पुढच्या वेळी सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना तुमच्या कामी येईल

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 28 ऑक्टोबर : सार्वजनीक वाहनांमधून प्रवास करताना सीट मिळवणे हे फारच कठीण काम आहे. ही वाहानं जसं की ट्रेन, बस, मेट्रो हे आधीपासूनच भरुन येतात, त्यामुळे लोक आपली सीट पकडून ठेवतात. ज्यामुळे उशीरा किंवा मागून चढणाऱ्या लोकांना सिट मिळत नाही, ज्यामुळे त्यांना संपूर्ण प्रवास उभं राहून करावं लागतं. मुंबई लोकल याचं एक उत्तम उदाहरण आहे. ज्या लोकांना सीट मिळत नाही त्यांची नजर सीट मिळवण्यासाठी खूपच आसूसलेली असते. पण त्याचा बऱ्याचदा काहीच फायदा होत नाही. सध्या याच संदर्भात विदेशातील एक व्हिडीओ सोशल मीडिया वरुन समोर आला आहे. ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल. एवढंच काय तर तुम्हाला कदाचित हा व्हिडीओ पुढच्या वेळी सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना कामी येईल. या व्हिडीओमध्ये एक तरुणी उभी असते. जी आधी दिसताना साधी दिसत असते. परंतू काही वेळातच ती आपलं पोट असं काही फुगवते की ती जणु काही प्रेग्नेंट असल्यासारखीच वाटते. जी अखेर तिच्या स्वत:साठी बसमध्ये जागा मिळवते. जे पाहून जवळ उभ्या असलेल्या आजोबांचा चेहरा पाहण्यासारखा असतो. हे ही वाचा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल आपल्याला तर हे माहित आहे की काही सार्वजनीक वाहानांमध्ये महिलांसाठी किंवा गरोदर महिलांसाठी राखीव जागा असतात. तसेच आपल्याकडे वृद्ध लोकांसाठी देखील राखीव जागा असतात. तर अशाच गोष्टीचा फायदा घेत या महिलेनं आपल्याला सीट मिळवली आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती देखील बसमध्ये प्रवास करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बसमध्ये जागा न मिळाल्याने वृद्ध उभे आहेत. वृद्ध व्यक्तीला कोणीही जागा देत नाही. हे पाहून वृद्ध उभे राहून प्रवास करू लागतात. त्याचवेळी एक मुलगी बसमध्ये चढली. मुलगी सीटजवळ उभी आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती इकडे-तिकडे जागा शोधू लागते. मग ती थोडा वेळ उभी राहते. ज्यानंतर ती एक युक्ती लावते आणि मग ती दीर्घ श्वास घेते. यानंतर, तिने पोट थोडेसे फुगवले, जेणेकरून ती गर्भवती असल्याचे समजते.

जाहिरात

गरोदर पोझमध्ये ती सीटवर बसलेल्या मुलीला सीट देण्याची विनंती करते. गर्भवती महिलेला पाहून सीटवर बसलेली मुलगी उठते. ती हातवारे करून गरोदर मुलीला बसायला सांगते. म्हातारा सगळे पाहून आश्चर्यचकित होतो. त्याच वेळी, मुलगी सीटवर आरामात बसते. हा व्हिडीओ ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या युजरने सोशल मीडिया ट्विटरवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले SAD.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे, ज्यामुळे या व्हिडीओला शेकडो लाइक देखील मिळाले आहे. काहींनी या तरुणीच्या युक्तीचे कौतुक केले आहे, तर काहींनी ही एक सॅड रिएलिटी असल्याचं म्हटलं आहे. ते काहीही असलं तरी देखील लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात