विरार, 07 जुलै : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय विरारमध्ये आला आहे. भर पावसात पोल दुरुस्तीचे काम सुरू असताना वीज कर्मचाऱ्याचा तोल गेला पण थोडक्यात तो बचावला. विरार पूर्वेकडील मनवेल पाडा इथं इलेक्ट्रिक पोलवर झाड पडल्याने पोल वाकला होता. तो दुरुस्त करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आले होतो. भरपावसाच्या पोल दुरस्तीचे काम सुरू होते.
पोल दुरुस्त करताना थोडक्यात बचावला वायरमन विरार येथील घटना pic.twitter.com/p3yyEPVWHM
— News18Lokmat (@News18lokmat) July 7, 2020
पण, दुरुस्त करत असताना अचानक वीज कर्मचाऱ्याचा तोल गेला आणि तो कोसळला. सुदैवाने तो लटकत बचावला. गेल्या चार दिवसांपासून वसई-विरारमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्याने लावला सीसीटीव्ही कॅमेरा,गोठ्यात जे दिसले ते पाहून झाला हैराण त्याचा फटका झाडांना बसून इलेक्ट्रिकचे पोल पडत आहे. मनवेल पाडा येथील जळबाव वाडी अत्तार अपार्टमेंट येथे काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने झाड इलेक्ट्रिकच्या पोलवर पडले त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दल आणि वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले होते. त्यावेळी ही घटना घडली. जीवाची बाजी लावून वीज कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान काम करत आहे. संपादन - सचिन साळवे

)







