शेतकऱ्याने चोरांसाठी लावला सीसीटीव्ही कॅमेरा, गोठ्यात जे दिसले ते पाहून झाला हैराण

दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गावठी गाई आणि एक वासरू असा एकूण सात जनावरांचा गोठा आहे.

दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गावठी गाई आणि एक वासरू असा एकूण सात जनावरांचा गोठा आहे.

  • Share this:
रायचंद शिंदे, प्रतिनिधी आंबेगाव, 07 जुलै : चोरांच्या उपद्रवामुळे शेतातल्या डाळींब पिकाचे नुकसान झाले म्हणून एका शेतकऱ्यांने घराभोवती आणि डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आणि  विशेष म्हणजे कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी  सीसीटीव्हीत बिबट्याच पहायला मिळाल्याची घटना घडली आहे. लौकी गावातील  दरेकरवस्तीत  राजेंद्र रामदास वाळूंज यांच्या गावठी गाईच्या गोठ्यात बिबट्याने रविवारी रात्री शिरकाव करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने  पिंजरा लावला आहे. दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गावठी गाई आणि एक वासरू असा एकूण सात जनावरांचा गोठा आहे. तसंच 35 एकर डाळिंबाची बागही घरासमोरच आहे. चोरांच्या उपद्रवामुळे गेल्या वर्षी त्यांचे डाळींब पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी त्यांनी घराभोवती व डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी त्यांना सीसीटीव्हीत बिबट्याच पहायला मिळाला. बिबट्या व गाईचा थरारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याने दहा कोंबड्या फस्त केल्या आहेत. मात्र, गाईंनी आक्रमकता दाखवल्याने बिबट्याची भंबेरी उडाली आणि गोठ्यातील 5 गाई बाल बाल बचावल्या. आजारपणाला कंटाळून पतीनं पत्नीवर झाडली गोळी, मग हातात घेतली बंदूक आणि... या भागात बिबट्याचा नेहमीच वावर आहे. वाळूंज यांनी सदर घटना स्थानिक ग्रामस्थांद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली होती. वनरक्षक कैलास दाभाडे, कल्पना पांढरे, राजेंद्र गाढवे व कर्मचारी कोंडीभाऊ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रविवारी परिसरात पिंजरा लावला आहे. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवण्यात आली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published: