बॉलिवूडच्या किंवा हॉलिवडूच्या सिनेमांमध्ये गाड्यांना आग लागल्याचे सीन पाहिले असतली. पण खऱ्या आयुष्यात असं प्रसंग घडतात तेव्हा घाम फुटतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून एखाद्या सिनेमाचा प्रसंग वाटेल, मात्र हा प्रकार खरंच घडला आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रकला आग लागल्याचं दिसत आहे. तरी ड्रायव्हरनं ट्रक थांबवला नाही. रेक्स चॅपमन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकच्या मागे चारा किंवा गवत ठेवल्यासारखे दिसत आहे. रस्त्यावरून चालत असताना अचानक या ट्रकनं पेट घेतला.
रस्त्यावर उभे असलेले लोक व्हिडीओ शूट करू लागले. ट्रक पेट घेत असूनही ड्रायव्हर काही थांबला नाही, तो पुढे जात राहिला. या ट्रकचे पुढे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कळत आहे. तसेच हा व्हिडीओ कुठला आहे, ही सुद्धा कळू शकले नाही आहे. वाचा- वानरानं वाघाची जिरवली! हल्ला करण्याआधीच मारली थोबाडीत, VIDEO VIRAL
वाचा- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO
— Chad ➐ (@ChadBlue_) May 27, 2020
दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत 8 लाख लोकांनी पाहिला आहे. एवढेच नाही तर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही लोकांनी दिल्या आहेत. वाचा- हा VIDEO पाहून रस्त्यावरचे खड्डेही तुम्हाला बरे वाटतील, पाहा जीवघेणा प्रवास