मुंबई 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या एक असा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील तुमचं हसू आवरु शकणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. परंतू हे सगळं करत असताना ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत आणि हा व्हायरल होणार व्हिडीओ देखील असाच आहे. परंतु हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, या व्यक्तीला प्रसिद्धीसमोर आपल्या फोनची देखील पर्वा नाही. आता तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत झाले असतील की, असं का? तर यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहाणं गरजेचं आहे. खरंतर व्हिडीओ काढण्याच्या मोहामुळे या व्यक्तीसोबत जे घडलं, त्यानंतर अशी चूक तो पुन्हा कधीही करणार नाही पाहा व्हिडीओ : म्हशीसमोर डान्स करणं तरुणीला भलतंच महागात पडलं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ नक्की असं काय घडलं? ही व्यक्ती मोबाईल स्टँडला लावून नाल्याच्या टोकावर ठेवतो आणि व्हिडीओ सुरु करुन डान्स करु लागतो. परंतु जशी ही व्यक्ती व्हिडीओ काढण्यासाठी उलटी फिरते, तेव्हाच हा फोन आणि स्टँड पाण्यात पडतो. जेव्हा ही व्यक्ती मोबाईलकडे तोंडकरुन उभी राहाते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपला फोन त्या नाल्यामध्ये पडला आहे. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता. या व्यक्तीने नात्यामध्ये हात घालून आपला फोन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला तो सापडलाच नाही. अखेर रिल्स काढण्याचा मोह त्याला महागात पडला, कारण त्या व्यक्तीला आपला फोन गमवावा लागला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केलं गेलं आहे. तर यावर अनेकांनी भरभरुन कमेंट देखील केलं आहे.