जाहिरात
मराठी बातम्या / Viral / म्हशीसमोर डान्स करणं तरुणीला भलतंच महागात पडलं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

म्हशीसमोर डान्स करणं तरुणीला भलतंच महागात पडलं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

म्हशीसमोर डान्स करणं तरुणीला भलतंच महागात पडलं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

एक तरुणी म्हशीसमोर उभी राहून डान्स करत होती. म्हशीला ते बहुधा आवडलं नसावं. तिने त्यानंतर जे काही केलं… ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra, Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई  22 ऑगस्ट : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, फूड इत्यादी अनेक विषयीचे VIDEO सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जे आपल्याला माहिती पुरवण्यासोबतच आपलं मनोरंजन देखील करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काय आहे VIDEO? एक तरुणी म्हशीसमोर उभी राहून डान्स करत आहे. जे या म्हशीला जराही आवडलेलं नाही, ज्यामुळे म्हैस या तरुणीसोबत विचित्र गोष्ट करते. ही तरुणी म्हशीकडे जाते आणि तिला खाण्यासाठी काहीतरी देते. परंतु त्यानंतर ती अचानक नाचू लागते. जे म्हशीला जराही आवडत नाही आणि ती या तरुणीकडे जोरात धावत येते आणि तिला धडक देते. वाचा बातमी :  आगीतून फुफाट्यात! तरुणाने 9 सेकंदात दोनदा स्वतःचाच ‘मृत्यू’ पाहिला; Shocking Video हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हिंदी मधली ‘‘आ भैंस मुझे मार….’’ ही म्हण नक्कीच आठवेल, या तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे.

जाहिरात

हा व्हिडीओ इतका मनोरंजक आहे की, तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही. हा व्हिडीओ psycho_biihari नावाच्या इंस्ट्रागाम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. परंतु या व्हिडीओला लोकांकडून खूप पसंत केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात