जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: सॅल्युट! एका झाडासाठी वादळाशी लढला तरूण; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: सॅल्युट! एका झाडासाठी वादळाशी लढला तरूण; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: सॅल्युट! एका झाडासाठी वादळाशी लढला तरूण; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ नक्की पाहा

Viral Video: सॅल्युट! एका झाडासाठी वादळाशी लढला तरूण; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ नक्की पाहा

Viral Video of Man saving tree: विकासाच्या नावाखाली सर्रास झाडं कापली गेल्याचं आपण अनेकदा पाहतो, पण एक झाड वाचवण्यासाठी कुणी आपला जीव धोक्यात घातल्याचं ऐकलंय का? एक झाडं वाचवण्यासाठी वादळाशी भिडणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : अलीकडच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. जंगलेच्या जंगले नष्ट झाली, मात्र माणसाची वृक्षतोडीची भूक काही शमली नाही. बेसुमार वृक्षतोडीमुळे जगभरात अनेक संकटे आ वासून उभी आहेत. झाडं आणि पर्यावरणाविषयी (Environment) चर्चा तर खूप होतात, परंतु प्रत्यक्ष झाडे (tree) वाचवायची वेळ येते तेव्हा मात्र कुणी पुढं येत नाही. झाडं तोडायला काहीच हरकत नाही, अशी मानसिकता असणाऱ्या लोकांचीही जगात कमी नाही. पण एक झाड वाचवण्यासाठी कुणी आपला जीव धोक्यात घातल्याचं ऐकलंय का? एक झाडं वाचवण्यासाठी वादळाशी भिडणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. हेही वाचा:  मांजरीचा जीव वाचवण्यासाठी धावले अनेक लोक; रेस्क्यू ऑपरेशनचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO वादळात दिला झाडाला आधार (Viral video of man saving tree from Storm)- पावसाळ्यात वादळ आल्यास आपण काय केलं असतं? साहजिकच एखादी सुरक्षित जागा शोधून तिथे आपण थांबत असतो. परंतु व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या तरूणाने असं काही केलं की त्यानं सर्वांच्याच काळजाचा ठाव घेतला. वादळात स्वतःला वाचवण्यापेक्षा तो आपल्या केळीच्या झाडाला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. केळीचं झाड तसं लहान, परंतु तरुणाला त्या झाडाची प्रचंड काळजी असते. भर पावसात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात हा तरूण केळीच झाड पडू नये म्हणून आधार देऊन उभा राहिला. ज्या वादळामुळे शेजारची झाडं वाकली होती, त्या वादळात झाडाला धरून ठेवल्याने स्वतःला इजा होऊ शकते याचीही फिकीर या तरूणाने केली नाही.

जाहिरात

हेही वाचा:  शिकारीला आलेला बिबट्याही फक्त पाहतच राहिला; शेवटच्या क्षणी मांजरीने खेळली आपली जबरदस्त ‘चाल’ सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस- हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. झाड वाचवण्याच्या या तरुणाच्या भावनेला अनेक जण सलाम करत आहेत. काही यूजर्सने लिहिले आहे की, ‘ही व्यक्ती झाड नाही तर आमचे भविष्य वाचवत आहे.’ त्याच वेळी, काही लोक असे मानतात की, हे सर्व रील म्हणजेच व्हिडीओ बनवण्यासाठी केलं गेलं आहे. असे जीवघेणे स्टंट करू नका, अशा सूचना अनेकजण या तरुणाला देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात