जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मांजरीचा जीव वाचवण्यासाठी धावले अनेक लोक; रेस्क्यू ऑपरेशनचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

मांजरीचा जीव वाचवण्यासाठी धावले अनेक लोक; रेस्क्यू ऑपरेशनचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

मांजरीचा जीव वाचवण्यासाठी धावले अनेक लोक; रेस्क्यू ऑपरेशनचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

एका उंच इमारतीतील (Building) मधल्या फ्लॅटजवळ एक मांजर अडकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. इमारतीची उंची पाहून त्या मांजराच्या जीवाला धोका (Risk) असल्याचं दिसतंय

    नवी दिल्ली 18 जून : अनेक जण मांजर, कुत्रा असे पाळीव प्राणी पाळतात. त्या लोकांचा या प्राण्यांमध्ये जीव असतो. या प्राण्यांना ते अगदी घरातल्या व्यक्तीप्रमाणे जपतात. प्राणीप्रेमी लोक घरातल्याचं नाही तर इतर प्राण्यांचीही काळजी घेताना दिसतात. त्यांच्यासोबतचे फोटो व्हिडिओही ते सोशल मीडियावर शेअर करतात. या शिवाय सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. त्यात मांजर (Cat), कुत्रा (Dog) अशा अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल (Animal Viral Video) होतात. मांजराचे बरेच व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यात काही क्युट (Cute) आणि काही मजेशीर (Funny) असतात, तर काही व्हिडिओ थरारक असतात. सध्या मांजराचा शॉकिंग व्हिडिओ (Shocking Video) व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. VIDEO - शिकारीला आलेला बिबट्याही फक्त पाहतच राहिला; शेवटच्या क्षणी मांजरीने खेळली आपली जबरदस्त ‘चाल’ एका उंच इमारतीतील (Building) मधल्या फ्लॅटजवळ एक मांजर अडकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. इमारतीची उंची पाहून त्या मांजराच्या जीवाला धोका (Risk) असल्याचं दिसतंय. ते मांजर तिथून चुकून खाली पडलं तर, त्याचा जीव वाचण्याची अजिबात शाश्वती नाही असंच वाटतंय. उंच इमारतीच्या एका फ्लॅटच्या गॅलरीजवळ हे मांजर अडकलं होतं. ते मांजर खाली पडलं असतं तर, त्याच्या जीवाचं काय झालं असतं हा विचार करूनही अंगावर शहारे येतील, असं ते दृश्य आहे.

    या व्हिडिओत आपल्याला दिसतं की एक माणूस कशाच्या तरी मदतीने मांजरीला खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओत इमारतीची उंची पाहून कोणीही घाबरेल. शेवटी ती व्यक्ती त्या मांजराला इमारतीवरून खाली पाडते. त्या मांजराला इमारतीवरून पाडण्यापूर्वी त्याला वाचवण्याची पूर्ण तयारी केलेली असते, असं व्हिडिओत दिसतं. वरून पडलेलं मांजर खाली पडून तिला दुखापत (Injury) होऊ नये म्हणून लोकांनी चारही बाजूंनी एक मोठी चादर धरून ठेवली आहे असं दिसतं. ते मांजर त्या चादरीत पडतं. OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल अशा रितीने लोकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे या निष्पाप मांजराचा जीव वाचला. मांजरीला वाचवण्यासाठी पूर्ण व्यवस्था केल्यामुळे मांजरीला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. नाहीतर एवढ्या उंचीवरून पडल्यानंतर त्या मांजरीचं वाचणं जवळजवळ अशक्य होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकरी मांजरीला वाचवणाऱ्या या लोकांचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. अनेक जण या लोकांनी दाखवलेल्या भूतदयेचं कौतुक करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात