अशी पेरणी तुम्ही कधीच पाहिली नसेल! शेतकऱ्यानं केलेल्या जुगाडाचा VIDEO VIRAL

अशी पेरणी तुम्ही कधीच पाहिली नसेल! शेतकऱ्यानं केलेल्या जुगाडाचा VIDEO VIRAL

अर्शद वारसीने हा व्हिडीओ 18 सप्टेंबररोजी पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने, Necessity is the mother of all inventions... म्हणजेच 'गरज ही शोधाची जननी' असेच कॅप्शन दिले आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : गरज ही शोधाची जननी आहे, ही म्हण तुम्ही कित्येक वेळा ऐकली असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला ही म्हण खरी वाटले. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, हे माहित नसले तरी या व्हिडीओमध्ये शेतकरी धान्याची पेरणी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन जणं एका युवकाचे पाय पकडून त्याला खेचत आहे, हा मुलगा शेतात धान्य पेरत आहे. या शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी लावलेली शक्कल पाहून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.

वाचा-झोप महत्त्वाची बाबा! चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...

वाचा-OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

अर्शद वारसीने हा व्हिडीओ 18 सप्टेंबररोजी पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने, Necessity is the mother of all inventions... म्हणजेच 'गरज ही शोधाची जननी' असेच कॅप्शन दिले आहे.

वाचा-मास्क नाही घातले म्हणून दिले नाही पेट्रोल, गुंडांचा पंपावर राडा, पाहा हा VIDEO

आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर जय जवान जय किसान! अशा कमेंट केल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या