वसई, 19 सप्टेंबर : वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथे पेट्रोल पंपावर नालासोपाऱ्यातील गुंडांनी पोलिसांच्यासमोर राडा करून रिक्षातून फरार झाले. धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी मध्यस्थी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि राडा करून निघून गेले.
एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही धक्कादायक घटना वसईतील बसीन पेट्रोल सप्लाय कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडली आहेत. हे गुंज मास्क न लावता पंपावर आले होते. त्यांना मास्क लावण्यासाठी सांगितले असता त्यांनी नकार दिला.
पेट्रोल पंप असो किंवा सार्वजिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मास्क लावणे हे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मास्क न लावल्यामुळे पंपचालकाने पेट्रोल देण्यास नकार दिला.
पेट्रोल न दिल्याचे राग धरून त्यांनी पेट्रोल पंपावर गुंडांना बोलावून तोडफोड केली. यावेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. हा सगळा प्रकार नागरिक आणि पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत होते.
याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 9 जणांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. असून पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.