मराठी बातम्या /बातम्या /Viral /पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये 'भूताची एन्ट्री'? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये 'भूताची एन्ट्री'? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी अशी एक विचित्र घटना घडते की पाहून तुम्हाला देखील धक्काच बसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २२ नोव्हेंबर : भूत असं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. जसं लोकांच्या देवाबद्दलच्या श्रद्धा आहेत. तसेच काही लोक या भूत-प्रेत सारख्या गोष्टींवर देखील विश्वास ठेवतात. हे किती खरं किंवा किती खोटं हे जो तो आपल्या अनुभवावरुन सांगत असतो किंवा मानतो. पण सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो सगळ्यांची झोप उडवत आहे.

या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी अशी एक विचित्र घटना घडते की पाहून तुम्हाला देखील धक्काच बसेल. या व्हिडीओ मागचं खरं कारण काय किंवा नक्की हे खरं आहे की कोणी घडवून आणलंय हे काही कळू शकलेलं नाही.

हे ही वाचा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली... रस्ता अपघाताचा 'हा' व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय

पण या व्हिडीओमध्ये तरी हे स्पष्ट लक्षात येत आहे की हॉस्पीटलमधील गार्ड हा कोणाशी तरी संवाद साधत आहे, तो तिथे नाहीय... हा त्याचा भास होता की हे मुद्दम घडवून आणलं, हे त्यांचं त्यांनाच माहित.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. ही व्यक्ती गार्ड असल्याचे कळत आहे. तेव्हा अचानक दरवाजा उघडतो. पण आत कोणीही येताना दिसत नाही. पण असं असलं तरी देखील हा गार्ड आपल्या जागेवरुन उठतो आणि कोणाशी तरी बोलू लागतो. तो तेथील गार्ड काढून त्याला आत देखील घेऊन येतो आणि बोलत बोलत, तेथील व्हिलचेअर वर बसायला सांगतो आणि ती चेअर घेऊन जातो.

या सगळ्यात हे तर कळत आहे की हा डॉक्टर काहीतरी बोलत आहे. पण तो कोणाशी बोलत आहे ती व्यक्ती काही दिसत नाहीय.

हा व्हिडीओ पाहून सगळेच लोक घाबरले आहेत. लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील एकमेकांना शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ redit वर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स आणि लाईक देखील केलं आहे.

ही घटना ब्यूनस आयर्समधील फिनोचियाटो सॅनेटोरियम या खाजगी देखभाल केंद्रात घडली. सोशल मीडियावर फुटेज व्हायरल झाल्यानंतर, केअर सेंटरच्या प्रवक्त्याने स्थानिक मीडियाला सांगितले की हा दरवाजाचा टेक्निकल फॉल्ट आहे. तो रात्रभरात सतत असा उघडत होता.

त्यांनी सांगितले की, "ते तुटले असल्याने, गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत 10 तासांत ते स्वतःहून 28 वेळा उघडले. त्यांनी असे देखील सांगितले की हा सुरक्षा रक्षक क्लिपबोर्डच्या कागदावर काहीतरी लिहित असल्याचे दिसून येते, परंतु रजिस्टरमध्ये कोणाचेही नाव नाही.

First published:

Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral