जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोबाईल पाहण्याचा मोह हत्तीला ही आवरेना, क्यूट Video Viral

मोबाईल पाहण्याचा मोह हत्तीला ही आवरेना, क्यूट Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

तुम्हाला माहितीय का की माणूसच नाही तर अगदी प्राण्यांना सुद्धा फोनचं वेड लागलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 3 नोव्हेंबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे इतके सुंदर असतात की ते आपल्या मनाला अगदी स्पर्श करतात. यामध्ये लहान मुलं किंवा प्राण्यांचे व्हिडीओ हे खूपच सुंदर असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो हत्तीचा आहे. हा व्हिडीओ खूपच सुंदर आहे, जे पाहून तुमच्या ओठांवर नक्कीच हसू येईल. खरंतर फोनचा मोह कोणाला आवरत नाही, आज काल लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच लोक फोन वापरतात. दिवसातील सगळ्याच गोष्टींसाठी मोठी माणसं फोनवर अवलंबून असतात. तर लहान मुलांना तुम्ही पाहिलंत तर ती सतत फोनमध्ये व्हिडीओ पाहात असतात किंवा गेम खेळत असतात. हे सगळं पाहून आपण बऱ्याचदा असं म्हणतो की माणसाला फोनचं जणू काही वेडचं लागलं आहे. परंतू तुम्हाला माहितीय का की माणूसच नाही तर अगदी प्राण्यांना सुद्धा फोनचं वेड लागलं आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील त्याच संदर्भातील आहे. ज्यामध्ये एक हत्ती मोबाईल फोन पाहात आहे. हे दुश्य खुपच सुंदर आहे. माहूत आणि हत्ती यांच्यातील नातं खूप घट्ट असतं. कारण, हत्तीचं पालनपोषण माहूतच करत असतो. त्यांच्यातील दोघांचं नात दर्शविणारं हा व्हिडीओ आहे. तामिळनाडू येथील कुंभकोणम कुंभेश्वर या मंदिरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मंदिराच्या आवारात फोन घेऊन बसला आहे आणि काहीतरी पाहात आहे. तेव्हा तेथे त्याच्या बाजूला उभा असलेला हत्ती हे पाहातो आणि त्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन उभा राहातो आणि त्याच्या फोनमध्ये पाहात बसतो. हा खरोखरंच खुप सुंदर आणि क्यूट व्हिडीओ आहे. हत्तीमधील हा निरागसपणा लोकांना देखील पाहायला खूप आवडत आहे. ज्यामुळे लोक या व्हिडीओला पसंती दर्शवत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात