मुंबई 30 जानेवारी : वाढदिवस किंवा इतर पार्ट्यांमध्ये केक कापण्याची परंपरा आता कॉमन झाली आहे. मित्रांमध्ये तर केक कापल्याशिवाय वाढदिवस साजरा होत नाही, त्यात मित्र म्हटले की मजा मस्करी ही येतेच. मग काय या सगळ्या मजा कोणत्या स्तरापर्यंत पोहोचते हे काही वेगळं सांगायला नको.
सध्या यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमध्ये एका मित्राचा वाढदिवस आहे आणि केक कापण्याचा कार्यक्रम होत आहे. पण त्याच्या सोबत उभ्या असलेल्या मित्राच्या मनात काही वेगळाच कार्यक्रम सुरु आहे.
हे ही पाहा : 'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या मित्राला केक कापणाऱ्या मित्रावर स्नो स्प्रे उडवायचा असतो. पण तो त्याचा हा प्लान फसतो आणि तो चुकून स्वत:वरच हा स्प्रे उडवतो. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की कशा पद्धतीने हा स्प्रे त्या मुलाच्या तरुणाच्या तोंडावर उडाला.
View this post on Instagram
हा व्हिडीओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खरंच खूपच मजेदार आहे, जो पाहिल्यानंतर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्या मुलाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, जो इतरांसाठी खड्डा खणतो त्यामध्ये तो स्वतः पडतो. हा व्हिडीओ जाणूनबुजून बनवण्यात आला आहे, असं एका युजरने लिहिले आहे. आता या व्हिडीओमध्ये किती सत्य आहे, हे त्यालाच माहित.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral