मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! साडेचार वर्षाच्या प्रिन्सनं आतापर्यंत पकडलेत 100 विषारी साप, त्या एक प्रसंगानं बनवलं धाडसी

बापरे! साडेचार वर्षाच्या प्रिन्सनं आतापर्यंत पकडलेत 100 विषारी साप, त्या एक प्रसंगानं बनवलं धाडसी

वयाच्या अवघ्या साडेचार वर्षात त्यानं आतापर्यंत तब्बल 100 साप पकडून जंगलात सोडले (4 Years Old Boy Rescued Dangerous Snakes) आहेत. विषारी साप पाहून मोठी माणसंही घाबरतात मात्र या चिमुकल्याला सापांची जराही भीती वाटत नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 16 जून : ज्या वयात लहान मुलं व्यवस्थित बोलायलाही शिकलेली नसतात आणि खेळण्यांसोबत खेळत असतात त्या वयात एक चिमुकला सापांसोबत खेळतो. शिवपुरा कॉलनीतील प्रिन्स साल्वी याला आता लोक विषारी सापांचा प्रिन्स म्हणून ओळखतात. शिवपुर कॉलनीतील रहिवासी असलेला हा प्रिन्स अवघा साडेचार वर्षांचा आहे. हा चिमुकला दररोज सुमारे 2 ते 3 साप पकडतो आणि त्यांच्यासोबत खेळण्याप्रमाणं खेळतो. वयाच्या अवघ्या साडेचार वर्षात त्यानं आतापर्यंत तब्बल 100 साप पकडून जंगलात सोडले (4 Years Old Boy Rescued Dangerous Snakes) आहेत. विषारी साप पाहून मोठी माणसंही घाबरतात मात्र या चिमुकल्याला सापांची जराही भीती वाटत नाही.

या मुलाच्या वडिलांचे मित्र कमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सचे वडील कुठेतरी निघून गेले आहेत. आता घरी केवळ त्याची आईच असते. आजी आधी विट भट्टीवर काम करायची, आता भंगार गोळा करून घर चालवते. त्यामुळे, प्रिन्स दिवसभर त्यांच्यासोबतच राहातो. आता लॉकडाऊन हटवण्यात येत आहे, त्यामुळे शाळा सुरू होताच प्रिन्सला शाळेत पाठवण्यात येईल, जेणेकरुन त्याला चांगलं शिक्षण मिळावं, असंही त्यांनी सांगितलं.

ब्लॅक फंगसनंतर देशात ग्रीन फंगसचा शिरकाव;अधिक भयंकर लक्षणं, रुग्णाचं फुफ्फस सडलं

शिवपुरी कॉलनीती रहिवासी कमल सांगतात, की प्रिन्सचे वडील त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबतच प्रिन्स मुक्तिधाममध्ये येत असे. इथेच त्यांची चांगली ओळख झाली. प्रिन्सचे वडील खूप दारू प्यायचे आणि नंतर ते कुठेतरी निघून गेले. त्यामुळे प्रिन्स दिवसभर प्रिन्स कमल यांच्यासोबतच राहू लागला. कमल जेव्हा साप पकडण्यासाठी जायचे तेव्हा त्यालाही सोबत घेऊन जात असे. एक दिवस ते साप पकडत असतानाच साप त्यांच्या पायात अडकला. त्यांनी लोकांना म्हटलं, की कोणीतरी याला बाजूला काढा, मात्र कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. यावेळी प्रिन्स स्कूटीवर बसलेला होता, अचानक तो पुढे आला आणि कमल यांच्या पायात अडकलेला साप त्यानं बाजूला काढला. तेव्हापासूनच प्रिन्सची सापांबद्दलची भीती संपली. आता प्रिन्स स्वतःच कमल यांच्यासोबत जाऊन विषारी सापांनाही काही मिनिटातच पकडतो. कमल म्हणतात, की प्रिन्स हात अधिक मजबूत असल्यानं तो सापांना सहजरित्या पकडू शकतो.

First published:

Tags: Snake, Snake video