मुंबई 09 डिसेंबर : रस्ते अपघात नेहमीच होत असतात. तुम्हाला दिवसातून एक तरी अपघाताची बातमी मिळेल. हे अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे होतात. तर कधी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे होतात. म्हणून नेहमी रस्त्यावरुन चालताना नीट चालण्यासाठी सांगितलं जातं. यासंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हे अपघात कधी किरकोळ तर कधी गंभीर असतात, पण असे काही हलके अपघात असतात जे पाहून तुम्हाला हसू येईल. यासंबंध अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर येत असतात. जे पाहून लोकांचे मनोरंजन होते. हे ही वाचा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली… रस्ता अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की हे कसे घडले. इंटरनेटवर एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी चुकून तिची स्कूटी घेऊन मंदिरात घुसते आणि तिथे पडते. नशीबाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली,तरी मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने ही घटना रेकॉर्ड केली आहे. या तरुणीची तिच्या चुकीमुळे अशी अवस्था झाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या तरुणीला ट्रोल केलं आहे. तसेच अनेकांनी तिला पापाकी परी देखील म्हटलं आहे.
तसे पाहाता बहुतांश मुलींकडू गाडी चालवताना अशा चुका होत असतात आणि त्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. पण सोबतच मुलांशी संबंधीत देखील असे काही व्हिडीओ समोर येतात, जे अशी चुक करुन बसतात. हे ही पाहा : पेट्रोल भरताना तरुणाकडून अशी चुक, Video पाहून तुम्हाला ही बसेल धक्का ही मुलगी कदाचित गाडी मंदिराबाहेर पार्क करत असावी. तेव्हा ती गाडीला एक्सलेटर देते आणि गाडी थेट मंदिराच्या आत शिरते. ज्यानंतर ही तरुणी समोरच्या नंदीच्या मूर्तीजवळ पडते. नशीबाने ती त्या मूर्तीवर आदळत नाही, नाहीतर तिला गंभीर दुखापत होऊ शकली असती. @JaikyYadav16 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यूजरने लिहिले की, ‘देव सर्वशक्तिमान आहे, जेव्हा तो तुम्हाला त्याच्या दरबारात बोलावेल तेव्हा तुम्हाला जावे लागेल.’ सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मुलीसोबत हा अपघात झाला. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.