मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चुकून स्पीड वाढला आणि तरुणीकडून घडला भयंकर स्टंट, पाहा VIDEO

चुकून स्पीड वाढला आणि तरुणीकडून घडला भयंकर स्टंट, पाहा VIDEO

गाडीचा स्पीड अचानक वाढला तर त्यावर चालकाचं नियंत्रण राहत नाही. असाच एक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 12 मार्च : सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जातात. त्यात अनेकदा गंमतीदार घटना कैद होतात. आता एका मुलीने घराच्या गेटवर गाडी चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजलेलं नसलं तरी अपघाताने गाडीचं स्पीड वाढून स्कूटी स्पीडने पुढे जात असल्याचं यात दिसतं.

याआधी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुणी मंदिराच्या दारात स्कुटी घेऊन उभा दिसते. ती स्कूटी स्टार्ट करताच स्पीड अचानक वाढून थेट मंदिरातच गाडी शिरल्याचं दिसतं.

अशाच पद्धतीनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये गेटसमोर असलेली गाडी सुरु करताच स्पीडने पुढे गेली. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे माहिती नसल्यानं याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.

गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंच असं अचानक स्पीड वाढू शकतं. स्कूटीमध्ये गिअर सिस्टीम नसल्यानं त्यावर नियंत्रण मिळवणं कठिण असतं. काही कळण्याच्या आतच अनावधानाने स्पीड वाढल्यास अपघाताला निमंत्रण मिळते.

हे वाचा : 16 महिन्यांची चिमुकली झोपेत रडायची, CCTV तून समोर आली धक्कादायक गोष्ट

First published:

Tags: Viral