मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पिल्लासाठी इवलासा जीव असलेल्या खारीनं कोब्य्राशी घेतला पंगा, पाहा VIDEO

पिल्लासाठी इवलासा जीव असलेल्या खारीनं कोब्य्राशी घेतला पंगा, पाहा VIDEO

 39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये खार आपली हार न मानता त्या सापाच्या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते.

39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये खार आपली हार न मानता त्या सापाच्या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते.

39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये खार आपली हार न मानता त्या सापाच्या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 13 मार्च : साप आणि मुंगुस यांची लढाई अनेकदा आपण पाहातो साप आणि पक्षांमधील लढाई पाहिली आहे. पण इवलासा जीव असलेली खार चक्क विषारी कोब्र्यासोबत लढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ही खार विषारी कोब्य्राला शह देण्यासाठी ठाण मांडून उभी आहे. आपला जीव धोक्यात घालून पिल्लाला वाचवण्यासाठी ही खार ज्या पद्धतीनं लढली ते पाहून युझर्सही थक्क झाले आहेत. IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यांच्यातील थक्क करणारा लढाईला थरारक व्हिडीओ अपलोड केला आहे. 39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये खार आपली हार न मानता त्या सापाच्या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते. आईचं प्रेमाला सीमा नाही. तिचं प्रेम अपार आहे. आपल्या मुलासाठी ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहाते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी शक्तीशाली कोब्र्यासोबत ही खार लढली आहे असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी या व्हिडीओवर लिहिलं आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला आपण पाहू शकता खार कोब्राला हुसकवून लावत आहे. कोब्रा तिथून निघून जावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र कोब्रा तिच्यावरच हल्ला करतो. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी खास प्रयत्न करते मात्र कोब्रा पुन्हा पुन्हा वेगानं हल्ला करत राहातो. या व्हिडीओला काही तासांमध्ये 5 हाजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 560 लोकांनी लाईक तर 100 हून अधिक लोकांनी कमेंट केली आहे. युझर्सनी या खारीचं आणि खारीमधल्या आईचं कौतुक केलं आहे. तिचं धडस आणि आपल्या पिल्लाला वाचवण्याची सुरू असलेली धडपड पाहून युझर्सही चकीत झाले. एवढासा जीव असलेल्या खारीनं थेट कोब्रासोबत लढण्याचं धाडस दाखवल्यानं सोशल मीडियावर या व्हिडीओ चर्चेचा विषय झाला आहे.
First published:

Tags: Viral video.

पुढील बातम्या