नाशिक : बॉलिवूड किंवा हॉलिवूड सिनेमात आपण अजब चोरीचा प्रकार पाहिले असतील. तसाच एक प्रकार प्रत्यक्षात समोर आला आहे. चक्क धावत्या ट्रकवर चढून तिथून बकऱ्या चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ कानपूर-लखनऊ हायवेवरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिथल्या पोलिसांनी हा व्हिडीओ या भागातील नसल्याचं सांगितलं आहे. रात्रीच्या वेळी एका चोर ट्रकमधून बकऱ्या खाली फेकत असून मागून येणारा चोरून नेत आहे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक बकऱ्या रस्त्यावर फेकल्यानंतर तो तरुण चतुराईने ट्रकमधून उतरतो.
दोन बैलांच्या भांडणात महिलेचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद झाली हादरवणारी घटनाचालत्या ट्रकमध्ये या चोरीचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, या चोरांना अशी चोरी करण्याची कल्पना कुठून आली? या चोरांनी हॉलिवूड चित्रपटातून ही कल्पना चोरली आहे का? असे प्रश्न सोशल मीडियावर युजर्स विचारत आहे.
चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल, चालत्या ट्रकमधून अशा चोरल्या बकऱ्या Video पाहून डोक्याला हाथ लावालसमाज माध्यमावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ह्या व्हिडिओमध्ये एका चालत्या ट्रक मधून बकऱ्या फेकण्याचा निर्दयी प्रकार समोर येत आहे. हा व्हिडिओ आधी उत्तर प्रदेश मध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यातील असल्याच ट्वीटकेल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील असल्याचा दावा केला जात असून अज्ञातां विरोधात घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. व्हिडीओ कधीचा आहे, यामागे कोण आहे याचा तपास केला जात आहे.