जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल, चालत्या ट्रकमधून अशा चोरल्या बकऱ्या Video पाहून डोक्याला हाथ लावाल

चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल, चालत्या ट्रकमधून अशा चोरल्या बकऱ्या Video पाहून डोक्याला हाथ लावाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा चोरीचा व्हिडीओ पाहून तुमचं डोकं देखील चक्रावेल. कारण हे चोर एका मोठ्या चालत्या ट्रकमधून बकऱ्या चोरत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : चोर हे इतके हुशार असतात की ते चोरी करण्यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढतातच. मग ती पैशांची चोरी असोत, बँकेतील चोरी असोत, सायबर फ्रॉड असोत किंवा मग बकऱ्यांची चोरी. चोर असा मार्ग काढतात की कोणी दुसरा त्याबद्दल विचार देखील करु शकणार नाही. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. हा चोरीचा व्हिडीओ पाहून तुमचं डोकं देखील चक्रावेल. कारण हे चोर एका मोठ्या चालत्या ट्रकमधून बकऱ्या चोरत आहेत. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. बकऱ्या चोरण्यासाठी चोरांनी अशी शक्कल लावली की त्यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही. हा व्हायरल व्हिडीओ मनोरंजक आहेच शिवाय तो धोकादायक देखील आहे. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video या व्हिडीओत नक्की काय घडलं? हा व्हिडीओ रात्रीच्या अंधारातील आहे. जेथे एक्सप्रेस वे वर एक ट्रक धावत आहे आणि या ट्रकच्या पाठीमागे तुम्ही एक व्यक्ती पाहू शकता. ही व्यक्ती या ट्रकमधील बकरी चालू गाडीमधून खाली फेकत आहे. तो एक दोन नाही, तर अशा असंख्य बकऱ्या ट्रकमधून खाली काढतो. हे सगळं घडत असताना या ट्रकच्या बाजूलात एक कार चालत असते. ही कार या चोरांचीच असते. काही काळाने कार ट्रकच्या अगदी मागोमाग येऊन उभी राहिली, त्यानंतर चोराने ट्रकच्या बोनटवर उडी घेतली आणि ट्रकपासून बाजूला झाला. हा संपूर्ण प्रकार एखाद्या धोकादायक स्टंटपेक्षा कमी नाही. या सगळ्यात थोडी जरी चूक झाली असती, तर काय घडलं असतं हे वेगळं सांगायला नको.

जाहिरात

चालत्या ट्रकमधी चोरीचा व्हिडीओ मागून येणारे कारमधील लोकांनी रेकॉर्ड केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, या चोरांना अशी चोरी करण्याची कल्पना कुठून आली? या चोरांनी हॉलिवूड चित्रपटातून ही कल्पना चोरली आहे का? अशा खोचक कमेंट्स नेटकरी करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

@vishnutiwariKNP वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे चित्रपटातील दृश्य नाही, कानपूर-लखनौ महामार्गावर धावणाऱ्या ट्रकमधून बकऱ्या चोरत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात