मुंबई 15 ऑक्टोबर : इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे इतके मजेदार असतात की, हसून-हसून तुमच्या पोटात दुखू लागेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला त्या तरुणावर हसावं की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील तरुण हा सापापासून आपला बचाव करण्यासाठी इकडे-तिकडे पळताना दिसत आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या हृदयाचे ठोकेही वाढत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीची अवस्था पाहून तुमचेही हृदय हेलावून जाईल, तो सापापासून पळून जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र साप त्याच्या मागे असा काही पडला आहे की बस्स… हा तरुण जिकडे जातोय तिकडे हा साप त्याचा पाठलाग करत आहे. जे पाहाताना खूपच मजेदार वाटत आहे. पण या व्हिडीओ मागचं सत्य काही वेगळंच आहे. हे ही पाहा : VIDEO - असह्य छळानंतर शांत गोमातेने घेतला रुद्रावतार; तरुणाला तिथंच दिली भयानक शिक्षा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बागेत साफसफाई करताना दिसत आहे, त्याला अचानक त्याच्या मागे साप दिसला. व्हिडीओमध्ये तो माणूस घाबरून उडी मारतो आणि ओरडू लागतो, तसेच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला देखील तो सापच असल्याचे वाटेल, मात्र त्याच्या मागे साप नसून तो सापाचा डमी आहे, म्हणजेच नकली साप आहे.
खरंतर या तरुणाच्या मित्रांनी त्याची मस्करी केली, त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या मित्रांनी हे सगळं घडवून आलं होतं. हे ही पाहा : पाहताक्षणी वाटेल सापाची जोडी, नागमोडी वळणाच्या रेल्वे ट्रॅकचे पाहा काय आहे सत्य! हा मजेशीर व्हिडिओ kritastattoo_official या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक देखील त्याची मजा घेताना दिसत आहेत. तर काही लोकांना या तरुणाची दया देखील आली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला 73 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. यावर लोकांनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत. काही जणांनी सांगितले की आजची ही घटना तो व्यक्ती आयुष्यभर लक्षात ठेवेल.