जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाहताक्षणी वाटेल सापाची जोडी, नागमोडी वळणाच्या रेल्वे ट्रॅकचे पाहा काय आहे सत्य!

पाहताक्षणी वाटेल सापाची जोडी, नागमोडी वळणाच्या रेल्वे ट्रॅकचे पाहा काय आहे सत्य!

पाहताक्षणी वाटेल सापाची जोडी, नागमोडी वळणाच्या रेल्वे ट्रॅकचे पाहा काय आहे सत्य!

एकाच ट्रॅकवर अनेक नागमोडी वळणं असतील यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा फोटो खोटा आहे, असंही तुम्हाला वाटेल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 ऑक्टोबर :  रेल्वेगाडीनं लांब पल्ल्याचा प्रवास करताना एखाद्या स्टेशनबाहेर गाडी पडते तेव्हा दरवाजाजवळ येऊन वाकून पाहिलं तर रेल्वे ट्रॅकचं नागमोडी वळणं दिसतं. यावरून ट्रेन धावते तेव्हा मागील कोचमधील व्यक्तीलाही इंजिन सहज दिसायला लागतं. सापाप्रमाणे गाडीचा प्रत्येक कोच नागमोडी वळणं घेत पुढे धावतो. हा अनुभव घेणं प्रवाशांसाठी खरोखरच एक प्रकारची पर्वणी असते. जंक्शन असलेल्या ठिकाणी किंवा कुठल्याही स्टेशनबाहेर एका ट्रॅकवर एखादं वळणं असतं. परंतु, एकाच ट्रॅकवर अनेक नागमोडी वळणं असतील यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण प्रत्यक्षात न्यूझीलंडच्या एका रेल्वे ट्रॅकवर असा प्रकार पाहायला मिळतो. या रेल्वे ट्रॅकचे व्हायरल फोटो पाहिले तर ते बनावट असल्याचं वाटू शकतं. पण ते खरं असल्याचं समोर आलं आहे. रेल्वेने प्रवास करताना तुम्ही अनेकदा रेल्वे ट्रॅक पाहिले असतील. त्यात ट्रॅक नेहमी सरळ असल्याचं दिसतं. दोन रूळांतील अंतरही रेल्वे गाडीच्या चाकांमधील अंतराएवढंच असतं. ट्रॅकवर गाडीला वळण घ्यायचं असेल तेव्हा गाडी हळूहळू वळवली जाते, जेणेकरून गाडीची गती अधिक असल्यास गाडी वळवताना पूर्णपणे उलटी होणार नाही किंवा रूळांवरून खाली उतरणार नाही. पण नागमोडी वळणाचे रूळ पहिल्यांदाच पाहायला मिळाले. हा फोटो खोटा आहे असं प्रथमदर्शनी वाटू शकतं. पण प्रत्यक्षात असे अनेक नागमोडी वळणांचे रूळ आहेत. VIDEO  महिलेचा डोळा उघडून पाहताच डॉक्टर हादरले; एका सवयीचा दिसला भयानक परिणाम हे का घडलं? फोटोमधील रेल्वे ट्रॅक पाहिल्यानंतर कुणीतरी खोडसाळपणे रुळांचा फोटो बदलून व्हायरल केल्याचं वाटू शकतं किंवा एखाद्या चित्रपटाच्या सेटसाठी असा ट्रॅक बनवला तर नाही ना, अशी शंकाही मनात निर्माण होऊ शकते. परंतु, प्रत्यक्षात भूकंपामुळे रुळांची अशी अवस्था झाली आहे. Blogs.agu.org वेबसाइटनुसार 2010 च्या रिपोर्टमध्ये हा ट्रॅक न्यूझीलंडमधील रॉलेस्टोनचा येथील असल्याचं समोर आलं आहे. सप्टेंबर 2010 मध्ये न्यूझीलंडमधील कँटर्बरी इथं 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे इथे मोठा विध्वंस झाला. भूकंपामुळे रेल्वे ट्रॅक पूर्ण उखडला गेला आणि त्याचा आकार पूर्णपणे नागमोडी झाला होता. ट्रॅफिक सिग्नलमध्ये हार्ट; Photo Viral, पण याचा अर्थ काय? रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, किवी रेल्वेच्या मॅलकम टेसडेलने हा फोटो वेबसाईटला पाठवला होता. फोटोत दिसते त्याप्रमाणे भूकंपानंतर रेल्वे इंजिनीअर्स रुळाला सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत. फोटो पाहून अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॉम्प्रेशनमुळे रूळांची अशी अवस्था झाल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात