धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL

धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोब्रा जातीच्या सापासोबत आजीची ही वागण्याची पद्धत योग्य नाही असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : साप आणि त्यातही नाग म्हटलं की अंगावर शहारे येतात आणि भीतीनं शरीर थरथर कापायला लागतं. गेल्या काही दिवसांमध्ये घरातून साप निघण्याचं प्रमाण वाढत आहे. असंच एका घरात कोब्रा जातीचा नाग आढळला. आजीनं मोठी हिम्मत करून या सापाची शेपटी पकडली आणि त्याला फरफटत घराबाहेर काढलं. आजीच्या या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आजीनं या नागाच्या शेपटीला दोरीसारखं पकडलं आणि मोकळ्या जागेत फरफटत घेऊन गेली आणि भिरकावून लावलं. कोब्रा आणि नाग शब्द उच्चारला तरी भल्या भल्यांची जिथे बोबडी वळते तिथे आजींनं हिम्मत दाखवून नागाची पुंगी वाजवली आहे.

हे वाचा-धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोब्रा जातीच्या सापासोबत आजीची ही वागण्याची पद्धत योग्य नाही असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे. सुशांत नंदा यांनी 26 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

काही युझर्सनी आजीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. आजीनं या सापापासून स्वत:चं संरक्षण केलं आहे असंही काही युझरनं म्हटलं आहे.

हे वाचा-धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग...

हे वाचा-काँग्रेस लाचार, जनाची नाही.. मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, विखे पाटलांची टीका

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading