मुंबई, 28 सप्टेंबर : असं म्हणतात एकीचं बळ खूप मोठं असतं. कोणतीही गोष्ट एकानं करण्यापेक्षा अशक्य गोष्टही मिळून शक्य होते. असाच काहीसा प्रकार म्हैस आणि सिंहाच्या बाबतीत घडला आहे. सिंहाचा कळप मिळून एका म्हशीची शिकार करतो असं खूपदा पाहिलं आहे. पण म्हशीनं सिंहाच्या कळपाला पळवून लावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एकीकडे सिंहाचा कळप शांतपणे ऊन घेत पहुडल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही सिंह इकडे तिकडे फेऱ्या मारत आहेत. अचानक समोरून म्हशींचा कळप येतो आणि सिंहांची पळताभुई थोडी होती. संतापलेल्या या म्हशी सिंहांच्या अंगावर धावून जातात आणि सिंह तिथून पळ काढतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Battle of Waterloo for lions...
— Susanta Nanda (@susantananda3) September 25, 2020
United buffalo heard outgunning the lion pride.
( Shared by Erik Solheim) pic.twitter.com/6qRpBRIsxe
'शेर को भी सवा-सेर' मिलता है।
— Ranjeet Kr (@rks12oct1998) September 26, 2020
United power 💪🏾
— Kasthuri Prasad BS (@KasthuriBs) September 25, 2020
हे वाचा- तहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है! हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून 79 जणांनी रिट्वीट आणि कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं शेरास सव्वा शेअर मिळाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक युझर्सनी एकीचं बळ खूप मोठं आणि मोलाचं असतं असंही म्हटलं आहे. कितीही मोठं संकट आलं तरी एकत्र लढल्यास त्यावर यशस्वीपणे मात करता येते हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. जंगलाचा राजा असलेल्या सिंहासमोर कुणी एकटं उभं राहू शकत नाही मात्र म्हशींच्या कळपानं तर या सिंहांची पळता भुई थोडी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.