मुंबई, 01 मे : देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक प्राणी जंगलसोडून रस्त्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. हत्ती आपल्या पिल्लांसोबत जात असताना अचानक रस्त्यावरून दुचाकी आली. ह्या दुचाकीस्वाराला पाहून हत्तीला संताप आला आणि त्याने दुचाकीस्वाराला रागाच्या भरात या हत्तीनं हुसकवून लावलं आहे. हा हत्ती संतापला आणि त्यानं समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारावर हल्ला केला. त्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो खाली पडला. संतापलेला हत्ती पाहून दुचाकी सोडून चालक फरार झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्ही. श्रीधर यांनी शूट केला आहे. ते म्हणाले की जेव्हा दुचाकीस्वाराने सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि हत्तीसह रस्ता ओलांडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही घटना घडली.
16 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 604 जणांनी लाईक केलं आहे. 142 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. इतरवेळी शांत असणारा हत्ती मात्र आज नेमका समोरून येणाऱ्या दुचाकीचालकावर खूप चिडलेला होता. वन विभागाचा इशारा न पाळल्यानं हा प्रकार घडल्याचं वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे वाचा- लॉकडाऊनंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, बंद होऊ शकते ‘ही’ सेवा हे वाचा- Coronavirus ‘चीनी’ व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर संपादन- क्रांती कानेटकर