लॉकडाऊनंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, बंद होऊ शकते 'ही' सेवा

लॉकडाऊनंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, बंद होऊ शकते 'ही' सेवा

कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सध्या 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 3 मेनंतर काय होणार? असा प्रश्व सर्वांच्या मनात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सध्या 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 3 मेनंतर काय होणार? असा प्रश्व सर्वांच्या मनात आहे. असे असले तरी मेट्रो, ट्रेन किंवा इतर वाहतूक सेवा एवढ्यात सुरु करण्यात येणार नाही. दरम्यान या सगळ्या परिस्थितीनंतर मेट्रो सेवेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात.

देशभरात मेट्रो गाड्या सुरू झाल्यावर सरकार टोकनने प्रवास थांबवू शकतो आणि केवळ कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवासास परवानगी दिली जाऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित एका अधिका्याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय लॉकडाऊननंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात व्यस्त आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका कमी करण्यासाठी सरकार सामाजिक अंतर पाळून मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. या उपायांमध्ये मेट्रो स्थानकांवरील दोन प्रवाशांमधील अंतर, त्यांची तपासणी आणि गर्दी नियंत्रण यांचा समावेश आहे.

वाचा-BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

टोकन प्रवास होणार बंद

यापुढे आता स्मार्ट कार्ड रीचार्ज केले जाऊ शकते.दरम्यान, टोकन पॅसेंजरला प्रवास सुरू करताना प्रत्येक वेळी खरेदी करावे लागते. यामुळे मेट्रो स्थानकांच्या काउंटरवर एक लांबच लांब रांगा लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

वाचा-3 मेनंतर 'या' परिसरात मिळणार सूट, गृह मंत्रालयानं दिले संकेत

3 मेनंतर काय होणार

गृह मंत्रालयानं 3 मेनंतर ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन परिसरांमध्ये काही सूट देण्यात येतील, असे संकेत दिले आहे. लवकरच याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येईल. असे म्हटले जात आहे की गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचे एकही प्रकरण समोर न आलेल्या परिसरांना सूट मिळू शकते. त्याशिवाय गेल्या 14 दिवसांत कोरोनाची कोणतीही नवीन प्रकरणे नसलेल्या क्षेत्रावरील काही निर्बंध हटवले जाऊ शकतात. याशिवाय रेड झोनमध्येही काही सूट मिळू शकते. परंतु याक्षणी हॉटस्पॉट झोनमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही आहे.

वाचा-Coronavirus 'चीनी' व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 30, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या