मुंबई 18 जानेवारी : सध्या सोशल मीडियावर एक अशी घटना समोर आली आहे. जी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. हो कारण ही स्टोरी इतकी गुंतागुंतीची आहे की, त्याबद्दल तुम्हाला आणखी जाणून घेण्याची इच्छा होईल. या कहाणीमध्ये एका मुलीचा पोलीस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. त्या मुलीचा शोध अखेर त्यांना लागला. पण तिच्याबद्दल माहिती मिळताच पोलिसांना देखील धक्का बसला. कारण ही मुलगी दिल्ली पोलीस दलाता हवालदार होती. आता नक्की या कहाणीमध्ये काय झालं असणार असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असणार. तर यासाठी तुम्हाला काही वर्षांपूर्वी जावे लागेल. हे ही पाहा : Google Search करुन मिळवलेली माहिती अशी ठरु शकते धोकादायक मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोच्छा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातून एक मुलगी घर सोडून दिल्लीला पळून गेली, तिच्या कुटुंबीयांना वाटले की कोणीतरी त्यांच्या मुलीचे अपहरण केले आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यामुळे पोलीस तिच्या मागावर होते. यानंतर अनेक महिने या मुलीचा शोध लागलाच नाही. चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अपहरणासंदर्भात एफआयआर दाखल केला होता, मात्र त्यांची ही घर सोडून गेलेल्या मुलीने दिल्लीत पोहोचून आपले शिक्षित पूर्ण केले, ज्यानंतर ती दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल झाली. आता या घटनेनंतर या तरुणीची स्तुती करत आहेत. काही लोकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात. पण असे ही काही लोक असतात, की जर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करायचेच असा निर्धार केला असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करतातच. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात आणि तेच या मुलीनं देखील केलं.
खरं तर, 2018 मध्ये, वडिलांना आपल्या मुलीचे लग्न करायचे होते, त्यांचे कुटुंब खूप गरीब होते. त्यामुळेच आपल्या मुलीचे लग्न वेळेवर करायचं त्यांनी मनात ठरवलं, पण मुलीला लग्न करायचे नव्हते. तिला आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. अखेर तिने घरातून पळून जाण्याचा विचार केला आणि आपले स्वप्न पूर्ण केलं.