मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विमानात हाय व्होल्टेज ड्रामा, प्रवाशाने पकडला मुलीचा हात आणि...

विमानात हाय व्होल्टेज ड्रामा, प्रवाशाने पकडला मुलीचा हात आणि...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे जो, युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातील असल्याची माहिती मिळत आहे. या विमानात एक धक्कादायक प्रकार घडला.

  • Published by:  Devika Shinde

मुंबई 12 ऑक्टोबर : सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय आपल्या समोर येईल हे काही आपण सांगू शकत नाही. कधी हे व्हिडीओ खूपच मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे धक्कादायक देखील असतात. परंतू लोकांना इथे जो व्हिडीओ सर्वाधीक आवडतो. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागतो.

सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे जो, युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातील असल्याची माहिती मिळत आहे. या विमानात एक धक्कादायक प्रकार घडला.

खरंतर या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने मॅजिक मशरूम खाल्ले होते, त्यानंतर प्रवासी दारूच्या नशेत होते. नशेच्या अवस्थेत या प्रवाशाने विमानात उपस्थित सर्व लोकांला त्रास देखील दिला आहे.

हे ही वाचा : कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल

रिपोर्टनुसार, ती व्यक्ती विमानात धावत होती, कॉकपिटजवळ टाळ्या वाजवत होती आणि घाणेरडे काहीही शब्द बोलत होती. आम्ही तुम्हाला सांगतो की मॅजिक मशरूमवर बंदी घातली गेली आहे, कारण त्याचे सेवन खूप धोकादायक आहे. या औषधांमध्ये पॅनीक अटॅक, मानसिक विकार आणि भ्रम यांसारख्या परिस्थिती निर्माण करण्याची क्षमता आहे.

परंतू तरी देखील या व्यक्तीला ते मशरुम मिळाले आणि त्याने ते खाल्ली देखील होते. परंतू त्याला ते कुठून आणि कसे मिळाले हे कळू शकलेलं नाही.

हे ही वाचा : कधी पाहिलीय उडणारी कार? दुबईमध्ये उडत्या कारची यशस्वी चाचणी, पाहा VIDEO

नक्की काय घडलं

चेरुय लोघन सेविला असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. तो माणूस बाथरुममध्ये घुसला आणि तेथे तोडफोड केली. जेव्हा विमानात बसलेल्या एका बाप मुलीने याचा विरोध केला, तेव्हा त्या व्यक्तीने मुलीचा हात पकडला.

या नंतर या व्यक्तीने हायवोल्टेज ड्रामा केला. ज्यानंतर ही व्यक्ती विमानाच्या जमिनीवर पडू लागली तेव्हा क्रू मेंबरने तिला सीटवर बसण्यास सांगितले परंतु चेरीने या प्रकरणावर दोन क्रू मेंबर्सना मारहाण करण्यास सुरुवात केली. यासगळ्या प्रकारामुळे सर्व प्रवासी देखील चक्रावले.

अखेर विमान उतरताच आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत या व्यक्तीने मॅजिक मशरूमच्या नशेत असल्याचे कबूल केले. फ्लाइट टेक ऑफ करण्यापूर्वी त्या व्यक्तीने हे सेवन केले. ज्यामुळे या व्यक्तीला 4 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्या व्यक्तीने आपल्या वर्तनाबद्दल माफीही मागितली आहे.

First published:

Tags: Shocking news, Social media, Viral