नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : गेल्या वर्षी ट्विटरवर शेअर केलेल्या गणिताच्या प्रश्नाने (Maths Problem) इंटरनेटवर (Internet) लोकांना दोन भागात विभागलं होतं. आणि यातील सर्वजणं आपआपल्या उत्तर बरोबर असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते. यामध्ये कोणाचं उत्तर योग्य आणि कोणाचं अयोग्य, याबद्दल कोणीच नेमकं सांगू शकत नव्हत. आता गणिताचा आणखी एक प्रश्न आणि त्याच्या उत्तरावरुन सोशल मीडियावर लोक एकमेकांसोबत वाद घातल आहेत. यातील सर्वजण आपलं उत्तर योग्य असल्याचं सांगत आहेत. गणिताच्या या प्रश्नाने ऑनलाइन विश्वात खळबळ उडवली आहे. (A question asked by a math teacher goes viral on social media) @ABlondeAvocado नावाच्या युजरने गणिताचा एक प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना ते सोडवण्याचं आव्हान दिलं. या पोस्टमध्ये या गणिताच्या शिक्षकाकडून 18x5 हा प्रश्न केवळ मानिसक प्रयत्नांनतून सोडविण्यास सांगण्यात आलं आहे. हे ही वाचा- VIDEO : चिमुरड्याने सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की डोळ्यात पाणीचं येईल यावर एका महिलेने उत्तर देताना लिहिलं की, मी 18 ला 20 या अंकात बदललं आणि मग 20x5=100 अशी सुरुवात केली. त्यानंतर 2x5=10, 100 – 10 =90. कदाचित मी कठीण पद्धतीचा अवलंब केला. मात्र काही असलं तरी मी योग्य उत्तरापर्यंत पोहोचले आहे.
Math teacher with a question:
— BlondeAvocado 𓍊𓋼𓍊 (@ABlondeAvocado) October 21, 2021
Using only mental math, solve 18x5
What steps did you take in your head to get to the answer?
अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजण तर हा प्रश्न पाहून हैराण झाले आहेत.
How I did it:
— BlondeAvocado 𓍊𓋼𓍊 (@ABlondeAvocado) October 21, 2021
Turned 18 into 20. 20x5= 100
Then multiplied the 2s that I added in order to subtract from the product
2x5= 10
100 - 10 = 90
A long way to get there, but I get there
90 या योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लोक विविध प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. यात कोणती पद्धत योग्य आणि कोणतही अयोग्य हे सांगणं जरा कठीणच आहे.