• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : रस्ता क्रॉस करीत होता चिमुरडा, सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की, डोळ्यात पाणीचं येईल

VIDEO : रस्ता क्रॉस करीत होता चिमुरडा, सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की, डोळ्यात पाणीचं येईल

काही सेकंदाचा हा व्हिडीओ पाहताना कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

 • Share this:
  बंगळुरू, 24 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Viral On Social Media) एका चिमुरड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मजेशीर असतात, मात्र काही व्हिडीओ पाहताना तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुरडा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. यादरम्यान त्याने सैन्याची (Indian Army) गाडी पाहिली आणि तेथेच थांबला. काही वेळानंतर त्याने सैन्याच्या जवानांना सॅल्यूट केला. चिमुरड्याचा सैन्याप्रती असलेला सन्मान पाहून कोणालाही अभिमान वाटेल. (small boy was crossing the road salute when he saw the army vehicle video viral on social media) हे ही वाचा-छतावरुन उतरण्यासाठी दीड वर्षाच्या मुलानं केलं असं काही..; VIDEO पाहून व्हाल शॉक ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बंगळुरू विमानतळावरील (Bangalore Airport) आहे. यापूर्वी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तामे सैन्याच्या जवानांसह राष्ट्रगीत गाताना एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ इंडियन आर्मी यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. जो खूप व्हायरल झाला होता. आता हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: