सिऊल, 08 जुलै : आतापर्यंत एखाद्या व्यक्तीचं रातोरात नशीब पालटल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण एकाच वेळी एकाच गावातील सर्वजण लखपती झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असं एका गावात घडलं आहे, जिथं एकाच वेळी गावातील सर्वजण लखपती बनले आहे. रातोरात या गावाचं नशीब पालटलं आणि संपूर्ण गावच लखपती झालं. आता हा चमत्कार नेमका झाला कसा हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. दक्षिण कोरियातील हे गाव. उन्प्योंग री असं या गावाचं नाव आहे. या गावात कोट्यवधी रुपये मिळाले जे संपूर्ण गावात वाटप करून प्रत्येकाला 57 लाख रुपये आले. आता इतके पैसे गावात नक्की आले कुठून, मिळाले कसे. तर यामागे आहे दक्षिण कोरियातील प्रॉपर्टी डेव्हलपर बायॉन्गचे चेअरमन ली जोंग कयुन.
उन्प्योंग री हे ली जोंग कयुनचंच गाव. 1941 मध्ये याच गावात ली जोंग केउनचा जन्म झाला. त्याने आपलं हे छोटंसं गाव सोडलं. त्यानंतर तो अब्जाधीश बनला. 1970 मध्ये त्यांनी रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांची एकूण संपत्ती 1.31 लाख कोटी रुपये आहे. कोरियातील टॉप 30 श्रीमंतांमध्ये त्यांचा समावेश होतो. ऐकावं ते नवल! तरुणीने चक्क नाल्याशी केलं लग्न; विचित्र आहे, पण कारण कौतुकास्पद किनला 2004 आणि 2018 मध्ये फसवणूक आणि करचोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, याचा त्याच्या व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपात त्याला तुरुंगात जावं लागलं. पण त्याने आपल्या गावासाठी जे काम केलं, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. आपल्या गावासाठी एवढी औदार्य दाखवणारी व्यक्ती तुम्ही क्वचितच पाहिली असेल. कयुनने उन्प्योंग री या गावासाठी कोटींची देणगी दिली आहे. त्यांनी त्यांच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना 57-57 लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत. गावातील 280 कुटुंबं आणि माजी विद्यार्थ्यांसह तब्बल 1596 कोटी रुपये दिले आहेत. त्याचे वर्गमित्र राहिलेल्यांनाही पैसे दिले आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके आणि टूलसेटचेही वाटप करण्यात आलं आहे. 300 वर्षे जुन्या बंद थिएटरमधील ‘ती’ भयावह 10 मिनिटं, आत दिसलं असं भयानक दृश्य; पाहा VIDEO हे पैसे गावातील लोकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.