काही लोकांनी माणसं नव्हे तर निर्जीव आणि विचित्र गोष्टींशी लग्न केल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता तर एका तरुणीने चक्क नाल्याशी लग्न केलं आहे. मेघन ट्रम्प असं या महिलेचं नाव आहे. व्यवसायाने ती जलतरणपटू आहे.
हे लग्न 17 जून रोजी झाले होते. लग्नाच्या कार्यक्रमात सर्व मित्र आणि नातेवाईकांना आमंत्रित केले. मात्र नाल्याच्या दुर्गंधीमुळे लग्नसमारंभात उपस्थित पाहुण्यांना जाणे कठीण झाले होते. दुर्गंधी येत असल्याने पाहुण्यांना उलट्या होऊ लागल्या.
खरंतर ज्या नाल्याशी तिने लग्न केलं तो नाला नव्हे तर एव्हॉन नदी आहे. ब्रिटनमधील एकोणिसाव्या क्रमांकाची ही नदी. जिचं बहुतेक पाणी ब्रिस्टलमधून वाहतं. ही नदी एकेकाळी स्वच्छ असायची. मात्र आता संपूर्ण शहराची घाण त्यात टाकण्यात आली आहे.
मेघनने या लग्नाबाबत सांगितले की, या नदीच्या पाण्यामुळे तिची आणि तिच्या मित्रांची तब्येत बिघडल्याने तिनं हे केले. लोकांना नदीची खरी स्थिती दर्शविण्यासाठी आणि ते काय करत आहेत हे समजावून सांगण्यासाठी, मेघनने सर्वांना नदीकाठी लग्नासाठी आमंत्रित केलं.
आपल्या स्वार्थासाठी नद्या प्रदूषित करून त्यांचे नाल्यात रूपांतर केले आहे. लोकांना या नद्यांचे महत्त्व सांगण्यासाठी असं पाऊल उचललं. आता मेघनने एव्हन स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)