**लंडन, 07 जुलै :**एखादं घर वर्षभर बंद असेल तरी त्याची काय अवस्था होते, तुम्हाला माहिती आहे. अशा घरात जाण्यासही भीती वाटते. मग विचार करा, एखादी अशी जागा जी 300 वर्षे जुनी आहे. शेकडो वर्षांपासून बंद आहे. अशा जागी जाण्याची हिंमत तरी होईल का? पण एका व्यक्तीने ती डेअरिंग केली. एक व्यक्ती 300 वर्षे जुन्या बंद थिएटरमध्ये गेली. आत जाताच तिथं भयानक दृश्य दिसलं. याच थिएटरच्या आतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ब्रिटनच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये असलेलं हे ‘द थिएटर रॉयल हे थिएटर 1790 ते 1904 सालापर्यंतच सुरू होतं. त्यानंतर ते बंद झालं. 1937 साली ते पुन्हा चालू करण्यात आलं. 1900 लोकं बसण्याची क्षमता असलेल्या या थिएटरची क्षमता 2,200 सीट्सपर्यंत वाढवण्यात आली. एक्स्प्रेस यूकेच्या मते, एका जुन्या थिएटरची जागा एका मॉ़डर्न सिनेमा हॉलने घेतली. पण काही कालावधीने तो पुन्हा बंद झाला. आता यावर टाळंच आहे. शेकडो वर्षापासून ते बंदच आहे. Weird Tradition : सेल्फी आणि बरंच काही…; इथं मृतदेहांसोबत केल्या जातात विचित्र गोष्टी आता या बंद थिएटरमध्ये गेली ती एक व्यक्ती. एक अशी व्यक्ती जी अर्बन एक्सप्लोरर आहे. ब्रिटनमध्ये अर्बन एक्सप्लोरर्सचा ग्रुप आहे. हा ग्रुप यूके यूरबेक्स म्हणूनही ओळखला जातो. या ग्रुपचे लोक कित्येक वर्षे बंद असलेल्या ठिकाणांवर जातात. तिथं शोध घेतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका अर्बन एक्स्पोलरने जुन्या बंद थिएटरचा शेअर केलेला हा व्हिडीओ. थिएटर एका मोठ्या बिल्डिंगमध्ये होतं. या बिल्डिंगमधील बऱ्याच खोल्या तीन दशकांपासून बंद आहेत. जेव्हा हे बंद दरवाजे उघडण्यात आले तेव्हा सर्व हैराण झाले. जर्जर झालेल्या या थिएटरच्या आत जाताच अर्बन एक्स्प्लोरला असं वाटलं जणू तो 1700 च्या दशकात पोहोचला. तुटलेल्या भिंती, खुर्च्या होत्या. सर्वकाही उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. जणू काही एका सुंदर महालाचं खंडर झालं आहे. आयुष्यभराची कमाई खर्च करून खरेदी केलं घर; 3 वर्षांनी तो दरवाजा उघडताच हादरली महिला 1700 च्या दशकातील अनेक वस्तू इथं मिळाल्या. एकंदर पाहिल्यानंतर थिएटनंतर इथं क्लबसारखं काहीतरी बनवल्याचं दिसतं.
यूके यूरबेक्स युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.