न्यूयॉर्क, 25 सप्टेंबर : लग्नासाठी प्रपोज करणं हा एक खास क्षण असतो. हा क्षण अविस्मरणीय व्हावा यासाठी सगळी मुलं आणि मुलीही खास प्लॅनिंग करतात. कधी कधी नेमकं त्याचवेळी भलतच घडत आणि वेगळ्या कारणासाठी हा क्षण लक्षात राहतो. असंच काहीसं एका कपलसोबत घडलं. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ब्रुकलीन ब्रिजवर एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत असतानाच अपघात घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरूण गुडघ्यावर बसून ब्रुकलीन ब्रिजवर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. हा क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफ सज्ज असताना, अचानक समोरून वेगानं एक सायकलस्वार आला, आणि त्यांची टक्कर झाली. त्यामुळे हा क्षण टिपायचा सोडून या कपलला फोटोग्राफरची मदत करावी लागली. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाचा-ऑस्ट्रेलियात प्रेम, उदयपूरमध्ये केलं प्रपोज! लग्नात आला असा ट्विस्ट
वाचा-अबब! नालेसफाई करताना सापडला भलामोठा उंदीर, VIDEO पाहून व्हाल हैराण
फोटोग्राफर आणि सायकलस्वार यांच्याच झालेल्या टक्करनंतर अखेर तरुणानं गर्लफ्रेंडला प्रपोज केलं अन् तिने लग्नासाठी होकारही दिला. मात्र अपघाताचा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.