नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : उंदीर म्हटलं की आपल्यासमोर येतो तो एकदम छोटासा पण माणसाच्या उंची एवढा उंदीर समोर आला तर काय होईल? फक्त कल्पनाच करून हैराण व्हाल. पण हो असं खरंच घडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वात मोठा उंदीर असल्याचं सांगितलं जात आहे. नालेसफाई करताना भलामोठा उंदीर समोर आला आणि सफाई कामगार त्याला पाहून हैराण झाले. त्यांनी या उंदराला बाहेर काढलं आणि स्वच्छ आंघोळ घातली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सुरुवातीला या उंदराला पाहून सफाई कामगार आणि नागरिक घाबरले. त्यांनी याला अंघोळ घातली आणि नेमका हा काय प्रकार असावा याचा अंदाज लावू लागले. ही घटना मेक्सिको सिटीमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. सफाई कामगार गटार साफ करत असताना त्यांना काळा रंगाचा एक भलामोठा प्राणी सापडला. या सफाई कामगारांना 22 टन कचरा उचलण्याचं काम होतं.त्यावेळी हा उंदीर दिसल्यानं खळबळ उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा त्याला बाहेर काढले गेले तेव्हा समजले की हा उंदीर नसून हेलोवीन प्रॉप आहे. जे नाल्यात टाकलं होतं
हे वाचा-जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका
हेलोवीन प्रॉम म्हणजे साधारण टेडीबेअर सारखा उंदीर असावा जो नाटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या शो साठी वापला जातो असंही काही युझर्सनी म्हटलं आहे. त्यामुळे हा उंदीर खरा नाही हे त्याला अंघोळ घातल्यानंतर समजलं आणि सगळा गोंधळ मिटला. फेसबुकवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हे दृश्यं पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 100 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
द न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार एक महिला समोर आली आहे. हा प्रोप तिचा होता आणि या महिलेनं तो गटारात फेकून दिला होता असं समोर आलं आहे. काही वर्षांपूर्वी हा उंदीर तिने बनवला होता आणि तो नको असल्यानं फेकून दिला.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.