जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऑस्ट्रेलियात प्रेम, उदयपूरमध्ये केलं प्रपोज! अन् लग्नात आला असा ट्विस्ट की वरानं धरले वधूचे पाय

ऑस्ट्रेलियात प्रेम, उदयपूरमध्ये केलं प्रपोज! अन् लग्नात आला असा ट्विस्ट की वरानं धरले वधूचे पाय

ऑस्ट्रेलियात प्रेम, उदयपूरमध्ये केलं प्रपोज! अन् लग्नात आला असा ट्विस्ट की वरानं धरले वधूचे पाय

इंस्टाग्रामवर दीपा आणि ओलेग यांची प्रेमकथा चांगलीच पसंत केली जात आहे. या पोस्टला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 1.2 लाख लाईक्स मिळाल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : नुसतं प्रेम आहे, प्रेम आहे असं सांगून चालत नाही. तर दाखवूनही द्यायचं असतं. प्रेम हे मुळात भाषे पलीकडचं असतं, त्यामुळे नेहमी शब्दांनी व्यक्त न करता आपल्या कृतीतून द्यावं लागते. अशीच एक हटके लव्हस्टोरी सध्या चर्चेत आली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर दीपा खोसलानं (Diipa Khosla) नुकतीच Humans Of Bombayला आपली लव्ह स्टोरी सांगितली. दीपा आणि तिचा पती ओलेग बुलर यांची पहिली भेट ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठात झाली. दीपाने यावेळी ओलेगला ती कशी भेटली आणि दोघांचे लग्न कसे झाले हे सांगितले. दीपाने सांगितले की, विद्यापीठात ओलेग हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होता. जेव्हा जेव्हा त्याच्याशी बोलायचे तेव्हा मला खूप चांगले वाटायचे, मात्र त्याला इम्प्रेस करण्यासाठी काही करू शकले नाही. दीपा आणि ओलेग यांची भेट झाली तेव्हा ओलेग शेवटच्या वर्षात होता. त्यामुळे विद्यापीठात त्याचे फक्त सहा महिने उरले होते. दीपा म्हणाली की, ‘आमच्यात फारसा संवाद झाला नाही. आम्ही जेवणाच्या हॉलमध्ये भेटायचो किंवा कॅम्पसमध्ये एकमेकांना पाहायचो, ओलेगने विद्यापीठ सोडल्यानंतरही दोघे संपर्कात नव्हते. फक्त वाढदिवशी एकमेकांना शुभेच्छा द्यायचे. अचानक एकेदिवशी ओलेगनं दीपाला मेसेज केला आणि जेवायला जाऊया, असे सांगितले.

जाहिरात

दीपा त्यावेळी लंडनमध्ये होती. 6 महिने एकमेकांशी संवाद नसताना दोघांची भेट अ‍ॅमस्टरडॅममध्ये झाली. त्यावेळी दीपाला ओलेगबाबत प्रेम असल्याचे जाणवले. दीपा म्हणाली की, आम्ही त्यादिवशी खूप हसलो, खूप बोललो. मी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी काय कपडे घातले होते हेदेखील त्याला माहित होते. 200 विद्यार्थी असूनही. ही आमची पहिली डेट होती. त्यानंतर दोघांमध्ये स्काइपवरून संवाद सुरू झाला. त्यानंतर दोघं लिव्ह इनमध्ये राहू लागले. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर दीपाला vogue कडून एका कार्यक्रमाचे आमंत्रण आले, हा कार्यक्रम उदयपुरात होता. ती एकटीच उदयपुरात गेली, कारण ओलेगला काही काम होतं. मात्र त्याच रोत्री अचानक ओलेगनं तिला सरप्राइज दिलं आणि ते तेथे पोहचला. तेथे पोहचताच त्यानं गुडघ्यावर बसून दीपाला प्रपोज केलं, आणि माझ्याशी लग्न करशील का? विचारले. काही दिवसांनी युरोपियन आणि भारतीय पद्धतीने दोघांनाही लग्न केले. हिंदू पद्धतीने लग्नात एक विधी होता, ज्यावेळी वधू वराच्या पायाला स्पर्श करते. हा सोहळा येताच ओलेगनं फक्त स्त्रियाच का म्हणत दीपाचे पाय धरले. इंस्टाग्रामवर दीपा आणि ओलेग यांची प्रेमकथा चांगलीच पसंत केली जात आहे. या पोस्टला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 1.2 लाख लाईक्स मिळाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात