ऑपरेशन थिएटरमध्ये 'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO

ऑपरेशन थिएटरमध्ये 'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO

ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना वायोलिन वाजवणाऱ्या महिलेचा VIDEO VIRAL

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी: नुसतं सर्जरी असं म्हटलं तरीही आपल्या अंगावर काटा येतो. ऑपरेशनदरम्यान आपल्याला शुद्धही नसते. मात्र ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना चक्क एका महिलेनं वायोलिन वाजवलं आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. लंडनमधील 53 वर्षांच्य़ा डॅगमार टर्नर (Dagmar Turner)असं यांचं नाव आहे. त्यांच्या धाडसाचं आणि जिद्दीची प्रेरणा घेण्यासारखी आहे. ऑपरेशन थेटरमध्ये ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना उत्कृष्ट वायोलिन वाजवणं हे फार कल्पना शक्तीच्या पलिकडे आहे मात्र हा व्हिडिओ पाहून आपल्याला कल्पना येईल. वायोलिन वाजवण्याची जिद्द आणि जगण्याची आशा अशा दोन्ही प्रेरणा या व्हिडिओमधून आपल्याला मिळतात.

डॅगमार टर्नर असं यांच्या म्हणण्यानुसार त्या वयाच्या 10 व्या वर्षापासून वायोलिन वाजवतात. त्यांचा हे वाद्य आणि त्यातून निघणारे सूर जणू त्यांचा जीव आहे. 2013 साली त्यांना डोकेदुखीचा अचानक त्रास उद्भवला. सुरुवातील दुर्लक्ष केलं मात्र तपासण्यांनंतर ट्युमर असल्याचं निदर्शन डॉक्टरांनी केलं. मेंदूच्या उजव्या बाजूला ही गाठ असल्यानं धोका होता. ऑपरेशन केलं नसतं तर लकव्याची भीती होती. मात्र ऑपरेशन करूनही कोणतीच गॅरेंटी नव्हती. त्यानंतर स्मृतीभ्रंश किंवा विस्मरण किंवा अन्य धोके होतेच. तरीही त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा-डरते तो वो है...' मोदींचे शब्द वापरत अमृता यांचा VIDEO, गाणं नव्हे नवं वाद्य

त्यांच्यावर लंडन इथल्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये सर्जरी होणार होती. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली. या ऑपरेशननंतर मी वायोलिन वाजवू शकेन की नाही माहीत नाही मात्र मला ऑपरेशन दरम्यान वायोलिन वाजवण्याची परवानगी द्यावी. डॉक्टरही अचंबित झाले त्यांनी परवानगी दिली. ऑपरेशन सुरू असताना त्या क्लासिक जैज सॉन्ग समरटाइम संगीत वाजवत होत्या. त्यांचा वायोलिनच्या सुमधूर धुनमध्ये ऑपरेशन पार पडलं.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात पहिला पाहिला असं सर्जरी करणाऱ्या डॉक्टर कियोमार्स अशकन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा-मॉडेलच्या हॉट डान्सने युजवेंद्र चहल घाबरला आणि पळत सुटला, पाहा हा VIDEO

First published: February 21, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या