जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वडिलांनीच फुग्याला बांधून चिमुकलीला हवेत सोडलं; दृश्य पाहून चुकला आईच्या हृदयाचा ठोका, पाहा VIDEO

वडिलांनीच फुग्याला बांधून चिमुकलीला हवेत सोडलं; दृश्य पाहून चुकला आईच्या हृदयाचा ठोका, पाहा VIDEO

वडिलांनीच फुग्याला बांधून चिमुकलीला हवेत सोडलं; दृश्य पाहून चुकला आईच्या हृदयाचा ठोका, पाहा VIDEO

फुगे हवेत उडणं ही अगदीच साधी आणि सर्वसामान्य बाब आहे. मात्र, एखादी लहान मुलगी अचानक हवेत उडू (Baby Flying in Air) लागली तर?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 ऑगस्ट : आकाशात उडणारे फुगे (Ballons) पाहायला सर्वांनाच खूप आवडतं. याच कारणामुळे आपणही अनेकदा फुगे खरेदी करून ते मोकळ्या आकाशात सोडतो. यानंतर दिसणारं सुंदर दृश्य सतत पाहातच राहावं, असं वाटतं. फुगे हवेत उडणं ही अगदीच साधी आणि सर्वसामान्य बाब आहे. मात्र, एखादी लहान मुलगी अचानक हवेत उडू (Baby Flying in Air) लागली तर? मात्र, सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एका व्यक्तीनं आपल्या मुलीला फुग्यांना बांधून काही वेळासाठी हवेत सोडलं. VIDEO: डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाला रिअल सिंघमनं काढलं बाहेर, पण डॉक्टर म्हणाले… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला आपल्या बाळाला हवेत उडताना पाहून खूप घाबरते. बाळाला वाचवण्यासाठी महिला अगदी वेगात बाळाकडे धाव घेते. मात्र, जेव्हा महिलेला आपलं बाळ हवेत का उडतंय याचं कारण समजलं तेव्हा ती थक्क झाली. कारण बाळाच्या कमरेला फुगे बांधून या चिमुकलीच्या वडिलांनी तिला हवेत सोडलं होतं. मात्र, आपल्या दोन्ही हातांनी तिला पकडलंही होतं. या बाळाच्या वडिलांनी मस्करी म्हणून हे सगळं केलं होतं आणि काहीच वेळाच महिलेच्याही हे लक्षात आलं.

जाहिरात

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकमेकींपासून वेगळ्या झाल्या 3 बहिणी; फोटोनं आणलं एकत्र यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 6 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. Mack & Becky Comedy नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काहींच्या हा व्हिडिओ पसंतीस उतरला आहे तर काहींनी ही मस्करी महागात पडू शकते, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात