Home /News /viral /

निळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का? VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी

निळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का? VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी

व्हिडिओमध्ये दिसणारा साप निळ्या (Blue Snake Video) रंगाचा आणि अतिशय सुंदर आहे. मात्र तो दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच घातकही आहे

  नवी दिल्ली 06 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा हैराण करणारे तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सापाबद्दल बोलायचं झाल्यास सापाचं नाव ऐकताच बहुतेकांची अवस्था वाईट होते. सापाला पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. अनेक साप हे विषारी आणि धोकादायक असतात त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर राहाणंच योग्य समजतात. सध्या सापाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video of Blue Snake) होत आहे. या व्हिडिओबद्दलची विशेष बाब म्हणजे यातील सापाचा रंग निळा आहे. जिराफासोबत मस्ती करत होती महिला; प्राण्याने चेहऱ्यावर केला हल्ला, Shocking Video या दुर्मिळ सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात दिसणारा साप निळ्या रंगाचा आणि अतिशय सुंदर आहे. मात्र तो दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच घातकही आहे. हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. लोक या व्हिडिओवर भरपूर कमेंट करत असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की लोक सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही तो शेअर करत आहेत आणि सोबतच याला निरनिराळे कॅप्शनही देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे. Jamie Gnuman197 नावाच्या अकाऊंटवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओमध्ये हा निळ्या रंगाचा साप कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतो. यात केवळ एक साप नसून दोन साप आहेत. यातील एक लहान तर एक मोठा आहे. यातील मोठा साप कॅमेऱ्यात अशा पद्धतीने सरकतो, जणू तो आता त्यावर हल्ला करणार आहे.

  रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला शेळीने शिंगावर उचललं अन्...; हैराण करणारा VIDEO

  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं की निळ्या रंगाचे साप विषारी असतात. दुसऱ्या एकाने लिहिलं, हा निळ्या रंगाचा साप दिसायला अतिशय सुंदर आहे, मात्र प्रत्येक सुंदर गोष्ट प्रेमळ असेलच असं नाही. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, माणसांनी सापांपासून नेहमी दूर राहायला हवं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Snake, Snake video

  पुढील बातम्या