Home /News /viral /

रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला शेळीने शिंगावर उचललं अन्...; हैराण करणारा VIDEO

रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला शेळीने शिंगावर उचललं अन्...; हैराण करणारा VIDEO

Goat Attack Video: या व्हिडिओमध्ये दिसतं की एक शेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणीवर विनाकारण हल्ला करते. शेळी या तरुणीला आपल्या शिंगावर उचलून जमिनीवर आपटते.

  नवी दिल्ली 06 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहून नेटकरी खळखळून हसतात. तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र, मजेशीर व्हिडिओच लोकांच्या अधिक पसंतीस उतरतात. रडणाऱ्या घोड्याचा VIDEO Viral, डोळ्यातले अश्रू बघून नेटिझन्स इमोशनल! आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालेलं असताना हे व्हिडिओ पुन्हा एकदा हे हसू परत आणण्याचं काम करतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Goat Attack) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडिओमध्ये दिसतं की एक शेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणीवर विनाकारण हल्ला करते. शेळी या तरुणीला आपल्या शिंगावर उचलून जमिनीवर आपटते.
  हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून याला लोकांची चांगलीच पसंतीही मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका विजेच्या खांबाजवळ शेळी उभा आहे. इतक्यात तिथून तीन तरुणी जात असतात. त्यांना पाहून अचानक यातील एक शेळी भडकते आणि वेगात जाऊन यातील एका तरुणीला आपल्या शिंगावर उचलते आणि धाडकन जमिनीवर आपटते. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर तरुणीला सुरुवातीला काहीच कळत नाही. नंतर ती तिथून उठून निघून जाते. मात्र ज्या पद्धतीने शेळीने तिच्यावर हल्ला केला, त्यानुसार तिला भरपूर मार लागला असणार. आकाशातून कोसळला आगीचा गोळा, झाला जोरदार धमाका; विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ hasiya_kheediya नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 14 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, आज या बकरीची बिर्याणी बनणं निश्चित आहे. तर, दुसऱ्या एकाने लिहिलं, यात या मुलीची काय चूक आहे. याशिवायही अनेकांनी या मजेशीर व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Goat

  पुढील बातम्या