• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • याला करंट लागला की काय! युवकाचा नूडल्स बनवतानाचा VIDEO पाहून नाही आवरणार हसू

याला करंट लागला की काय! युवकाचा नूडल्स बनवतानाचा VIDEO पाहून नाही आवरणार हसू

एका नूडल्स (Noodle) बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. तो ज्या अनोख्या पद्धतीनं नूडल्स बनवत आहे, ते पाहून लोक हैराण झाले आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली 10 जुलै : या जगात टॅलेंटची (Talent) अजिबातही कमी नाही. मात्र, अनेकांना हे टॅलेंट जगासमोर आणण्याची संधीच मिळत नाही. तर, काही लोक आपल्या टॅलेंटच्या जोरावर यशाचं शिखर गाठतात. मात्र, सध्या सोशल मीडिया (Social Media) हा वेगळं टॅलेंट असणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्धीझोतात येण्याचं एक माध्यम ठरलं आहे. याच माध्यमातून अनेकजण रातोरात स्टार (Star) बनतात. अनेकांचं तर नशीबच बदलून जातं. अशाच एका नूडल्स (Noodle) बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. तो ज्या अनोख्या पद्धतीनं नूडल्स बनवत आहे, ते पाहून लोक हैराण झाले आहेत आणि त्याचं कौतुकही करत आहेत. बापरे! भरधाव कारवर अजगरानं घेतली उडी अन्...; पाहा घटनेचा Shocking Video आजकाल चर्चेत किंवा प्रसिद्धीझोतात येण्यासाठी प्रत्येकाला वेगळं काहीतरी करायची इच्छा असते. यात अगदी भोजन बनवणाऱ्या आचाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांचाही समावेश आहे. अशाच एका व्यक्तीची नूडल्स बनवण्याची पद्धत पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे मग्न होऊन हा व्यक्ती नूडल्स बनवत आहे. नूडल्स बनवणाऱ्या या व्यक्तीला पाहून काही वेळासाठी असं वाटतं, की याला करंट लागला आहे.
  लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यात तरुणींचं ढिशूम ढिशूम; पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ _food.affairs___ नावाच्या अकाऊंटवरुन 17 जूनला शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत सांगितलं गेलं आहे, की या नूडल्स बनवणाऱ्या व्यक्तीनं 2019 मध्ये शाजापुर, बंगळुरुमध्ये एका दुर्गा पुजा पंडालमध्ये स्टॉल लावला होता. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत, तसंच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: